२०१९ मध्ये असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले जे त्यातील मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री मुळे नव्हे तर त्यातील खलनायकांमुळे जास्त गाजले. यातील काही चित्रपट प्रेक्षकांची मन जिंकण्यात सफल झाली तर काही असफल. आज आम्ही तुम्हाला अशा पाच चित्रपटांमधून सांगणार आहोत जे बॉक्सऑफिसवर त्यातील खलनायका मुळे गाजले. या यादीत हॉलिवूडच्या एवेंजर्स एंडगेम चित्रपटाचे नाव देखील सामील आहे ज्यात विलन थॉमसला मारायला अनेक सुपरहिरो दिसले होते.
१) मरजावां –
मिलाद जावेरी यांनी दिग्दर्शित केलेल्या मरजावां या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख यांनी काम केले आहे. या चित्रपटात रितेश देशमुख ने खलनायकाची भूमिका साकारली आहे. तसे पाहता सिद्धार्थ मल्होत्रा चे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालेले नाहीत मरजावां हा चित्रपट देखील फ्लॉप होऊ शकत होता परंतु रितेश देशमुख ने साकारलेल्या विलन मुळे चित्रपट हिट झाला.
२) हाऊसफुल ४ –
अक्षय कुमारच्या या कॉमेडी चित्रपटात राणा दग्गुबाती ने खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याचा एक खतरनाक अंदाज पाहण्यास मिळाला. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच वेळी या भूमिकेबद्दल सस्पेन्स ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षकांना नक्की समजत नव्हते की कॉमेडी चित्रपटात खलनायक कसा काय. त्यानंतर सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मात्र त्यातील खलनायकी भूमिकेने सगळ्यांची नजर खिळवून ठेवली होती.
३) साहो –
यावर्षीचा सगळ्यात महागडा चित्रपट हा प्रभासचा साहो होता. हा संपूर्ण चित्रपट बनवण्यासाठी तब्बल ३५० करोड रुपयांचा खर्च केला गेला होता. या चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावली होती. याचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना खूप पसंत पडला. बॉलीवूड मध्ये हा चित्रपट यशस्वी होण्यामागे चंकी पांडेचे सर्वात मोठे श्रेय होते असे म्हटले तरी हरकत नाही.
४) दबंग ३ –
नुकताच प्रदर्शित झालेला सलमान खानचा दबंग  हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात सुपरस्टार सुदिप खलनायकाच्या भूमिकेत दिसतात. सुदीप ची फॅन फॉलोविंग बघा साउथ कडे हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला गेला. याचा फायदा चित्रपटला मोठ्या प्रमाणावर झाला. संपूर्ण जगभरातून या चित्रपटाने २०० करोड रुपयांचा गल्ला पार केला आहे.
५) एवेंजर्स एंडगेम –
हॉलिवूडच्या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर इतर सर्व चित्रपटांना मागे टाकत एक नवीन इतिहास रचला आहे. ज्याचा रेकॉर्ड अजून पर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. हा चित्रपट यशस्वी होण्यामागे या चित्रपटातील व्हिलनचे म्हणजेच थोनसचे सर्वात मोठे कर्तृत्व आहे. या चित्रपटात थोनस कसा मरतो हे पाहण्याच्या उत्सुकते पोटी प्रेक्षक सिनेमागृहात खेचला जात होता. थोनस या खलनायकी पात्रस मारण्यासाठी हॉलीवुडमधील सर्व सुपरहिरो एकत्र दाखवण्यात आले होते.