90 चे दशक गोल्डन एरा मानण्यात येते. कारण त्याकाळातील मुलांनी आधुनिक आणि आणि जुन्या गोष्टी यांचा अनुभव घेतला. बालपण तसेही ही खूप सुंदर असते कारण बालपण सुंदर असेल तर तरुणपण म्हातारपण आपोआपच आनंददायी होते. नव्वदच्या दशकात एक असा शो यायचा जो सर्वात लोकप्रिय शो होता. त्या शो च नाव आहे मिस्टर बीन मिस्टर बीन आपल्याला न बोलताही प्रचंड हसवून जायचा. त्याचे वेगवेगळे किस्से हे आजही आठवले किंवा पाहिले तरी पोट धरून हसायला येते.  या कार्यक्रमात मिस्टर बीन हे पात्र करणारे Rowan Atkinson यांचा अभिनय खरंच कौतुकास्पद आहे. आजही जो मिस्टर बीन शो आपण पाहतो तो 1990 ते 1995 यादरम्यान टीव्हीवर प्रक्षेपित केला गेलेला आहे. खरंच हा शो चिरकाल प्रेक्षकांना आनंद देणाराच आहे.त्यानंतर मिस्टर बीन हा शो कार्टून रुपातही साकारण्यात आला. विशेष म्हणजे मिस्टर बीन डॉट कॉम नावाची वेबसाईट इंटरनेटवर आहे ज्यावर मिस्टर बीन चे सगळे शो कार्टून शो आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का तुमचे आमचे मिस्टर बीन राजा महाराजांसारखे जीवन जगतात. तर जाणून घेऊयात कशी आहे त्यांची लाईफ स्टाईल.

https://images.metadata.sky.com

जवळजवळ पाच वर्ष मिस्टर बीन हा कार्यक्रम लोकांनी अक्षरशा डोक्यावर घेतला. त्यावेळी लोक Rowan Atkinson यांचे चाहते झाले हा शो जगातील टेलिव्हिजन इतिहासातील गाजलेल्या विनोदी शोपैकी एक आहे. Rowan Atkinson हे हे हॉलीवुड मधील एक लोकप्रिय अभिनेते आहेत. आहेत परंतु आजही लोक त्यांना मिस्टर बीन या नावानेच संबोधतात. अनेकांना त्यांचे खरे नावही माहिती नाही. त्यांनी ब्लैकेडर, नाईन ओ क्लॉक, न्यूज द सीक्रेट, पोलिसमॅन्स बॉल्स यांसारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले आहे.

रोवन अमेरिकेतील डरहम येथे हे जन्मले. त्यांचे वडील शेतकरी होते. किशोर वयात ते शेतात ट्रॅक्टर चालवायचे त्यावेळी त्यांनी स्वप्न पाहिले होते की जगातील सर्वात महागड्या कार आपल्याकडे असाव्यात. त्यानंतर त्यांनी ऑक्सफोर्ड येथील क्वींस कॉलेज मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना लोरी (मोठा ट्रक) चालवावी लागे. त्यांच्याकडे लोरी चालवण्याचे लायसेन्स ही आहे. रोवन हे आज 64 वर्षांचे आहेत त्यांना तीन मुले आहेत. रोवन  यांच्या अभिनयाकरिता  ब्रिटिनच्या महाराणीने विशेष गौरव केला होता. मिस्टर बीन हे आठ हजार करोड संपत्तीचे मालक आहेत त्यांचं नाव ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतले जाते. त्यांचं स्टारडम हे हॉलिवूडमधील मोठ्या ॲक्टर पेक्षाही जास्त आहे.त्यांचा लंडन येथे  आलिशान महाल आहे ज्याची किंमत अरबो रुपयात आहे. 2011साली ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स यांच्या लग्नातही त्यांना विशेष आमंत्रण दिले होते.

https://www.collierautomedia.com

रोवन यांच्याकडे जगातील सर्वात महाग कार कलेक्शन आहे. रोल्स रॉयस, एस्टोन मार्टिन डीबी2, बीएमडब्लू 328, आणि एक्यूरा, एनएसएक्स अशा जगातल्या महागड्या कार आहेत तर मैकलोरेन एफ १ ही महागडी कार असून याची किंमत अंदाजे 80 ते १०० कोटी इतकी आहे. अंदाजे डझनभर महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. रोवन यांचा गाडी चालवताना अनेकदा अपघात झाला असून ते त्यातून सुखरूप बचावले आहेत सर्वात जास्त कार इन्शुरन्स रक्कम ते भरतात.

https://www.newstrend.news

चौदाव्या एपिसोड नंतर मिस्टर बीन शो संपविण्यात आला होता. मात्र आजही ही जगभरात त्याचे रिपीट टेलिकास्ट आवडीने पाहिले जातात.  आजच्या काळात रोवन वेब सिरीजमध्ये काम  करत आहेत. अभिनयाशिवाय त्यांची हिंडमेक नावाची प्रोडक्शन कंपनी आहे.आजपर्यंत आपल्याला मिस्टर बीन हे विनोदी पात्र करणारे म्हणून रोवन माहिती होते पण त्यांचं खरं जीवन सर्वांनाच माहिती नव्हते. एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या स्वप्नाला सत्यात आणून जगातील महागड्या कारांचा मालक झाला. खरंच रोवन यांचे जीवन आपल्या सारख्या सामान्य माणसाला प्रेरणादायी आहे.