धोनीनेने गुपचूप केले होते लग्न, कारण आहे खास अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी…

3 Min Read

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि सर्वाना हैराण केले. महेंद्रसिंग धोनीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये धोनीने चाहत्यांचे आभार मानताना लिहिले कि, आज संध्याकाळी ७.२९ पासून मला रिटायर समजावे.

धोनीच्या रिटायरमेंटच्या बातमीने त्याचे चाहते दुखी आणि हैराण झाले आहेत. धोनीने आपल्या अनेक मोठ्या निर्णयांनी लोकांना चकित केले आहे. धोनीची पर्सनल लाईफ देखील याला अपवाद नाही. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ४ जुलै २०१० रोजी साक्षी सिंह रावतसोबत गुपचूप लग्न करून आपल्या चाहत्यांचा सरप्राइज केले होते.

धोनी आणि साक्षीने देहरादूनमध्ये लग्न केले होते. धोनीच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. धोनी आतादेखील आपल्या पर्सनल लाईफबद्दल उघडपणे बोलत नाही. दोघांनी लग्न देखील गुपचूप प्रकारे केले होते. धोनी आणि साक्षीच्या लग्नामध्ये निवडक लोकच सामील झाले होते.

साक्षीसोबत लग्न झाल्यानंतर माहीचे करियरदेखील शिखरावर गेले ज्यामुळे लोक साक्षीला धोनीची लेडी लक देखील म्हणतात. धोनी आणि साक्षीला एकमेकांची ओळख आधीपासून होती. धोनी आणि साक्षीचे वडील रांचीमध्ये एका कंपनीमध्ये काम करत होते.

दोघांच्या कुटुंबाचे पारिवारिक संबंध होते. इतकेच नाही तर दोघे एकाच शाळेमध्ये देखील शिकत होते. नंतर साक्षीचे कुटुंब देहरादूनला शिफ्ट झाले जिथे तिचे आजोबा आधीपासूनच राहत होते. यानंतर अनेक वर्षांपर्यंत दोघांची भेट झाली नाही आणि त्यांच्यामध्ये कोणताही संपर्क राहिला नाही. पण नशिबाला काहीतरी वेगळे हवे होते. अनेक वर्षांनंतर दोघांची भेट कोलकाताच्या ताज बंगाल हॉटेलमध्ये झाली, जिथे भारतीय क्रिकेट टीम थांबली होती. हे गोष्ट नोवेंबर-डिसेंबर २००७ ची आहे.

साक्षी त्या हॉटेलमध्ये इंटर्न होती. दोघांची भेट साक्षीच्या मॅनेजरने करून दिली. ज्यादिवशी त्यांची भेट झाली तो दिवस साक्षीचा त्या हॉटेल मधील शेवटचा दिवस होता. साक्षी गेल्यानंतर धोनीने मॅनेजरकडून तिचा नंबर मागून घेतला आणि तिला मॅसेजकेला. पहिला साक्षीला वाटले कि धोनी तिची चेष्टा करत आहे पण नंतर तिला माहित झाले कि तो भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. यानंतर दोघांमधील बातचीत वाढत गेली आणि जवळ जवळ दोन महिन्यानंतर मार्च २००८ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.त्या वर्षी साक्षी धोनीच्या बर्थडे पार्टीमध्ये देखील पोहोचली होती.

३ जुलै २०१० रोजी देहरादूनच्या एका हॉटेलमध्ये दोघांनी साखरपुडा केला. यानंतर ४ जुलै २०१० रोजी त्यांनी देहरादूनच्या जवळ विश्रांती रिसॉर्टमध्ये लग्न केले. दोघांच्या लग्नामध्ये अनेक खेळाडू आणि बॉलीवूड स्टार्स सामील झाले होते. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी दोघे एका मुलीचे पॅरेंट्स बनले. त्यांच्या मुलीचे नाव जीव आहे.

धोनी फक्त एक चांगला कर्णधारच नाही तर एक आइडियल पतीची आणि पित्याची भूमिका साकारत आहे. साक्षी इंस्टावर जे व्हिडिओ शेयर करते, त्यामधून हे स्पष्ट होते कि मुलगी जीवासोबत धोनी खूप मस्ती करताना पाहायला मिळतो. आता जेव्हा धोनीने रिटायरमेंट घेतली आहे तेव्हा कदाचित तो आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *