आपला मुलगा शिकून मोठा व्हावा त्याने, नाव कमवावे, चांगला पैसा कमवावा. असे प्रत्येक आईचे स्वप्न असते. प्रत्येक आईला तिच्या मुलांचे यश बघायचे असते. मुलाचे उज्वल भविष्य बनवण्यापाठी त्याच्या आईचा मोलाचा वाटा असतो. मुलांना यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळी आई योग्य ते मार्गदर्शन करत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे. ज्याचा तुमच्या मुलांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.१) मुलांच्या नावाने सेव्हींग :- मुले लहान असताना त्यांच्या नावाने पैशांची साठवणूक करण्यास सुरुवात करा. आज बाजारात वेगवेगळ्या स्किम उपलब्ध आहेत. ज्याद्वारे तुम्ही वेळोवेळी मुलांच्या नावाने पैशांची गुंतवणूक करू शकता. ती रक्कम मुलं मोठी झाल्यावर त्यांना मिळते. या पैशांचा उपयोग तुम्ही मुलांच्या शैक्षणिक सोयीसुविधांसाठी करू शकता. यामुळे भविष्यात त्यांचे करियर योग्य त्या दिशेने जाते. आजकाल लोक मुलांच्या शिक्षणावर कमी पण त्यांच्या लग्नावर जास्त पैसे वाया घालवतात. परंतु लग्न हे साध्या पद्धतीने, कोर्टात किंवा सामूहिक पद्धतीने सुद्धा करू शकतात. त्याबद्दल मुलांना योग्य ते शिक्षण द्या.
२) योग्य संस्कार :- जीवनात पुढे कसे जावे, इमानदारीने कसे वागावे, चुकीची संगत धरू नये, आणि अपयशाने डगमगून जाऊ नये. या सर्व गोष्टी लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या आईवडिलांनी शिकवायला हव्यात. संकट आल्यास त्या संकटांना कसे सामोरे जावे व त्या संकटांमधून कसे सुखरूप बाहेर पडावे शिक्षण पालकांनी मुलांना द्यावे. कोणत्याही प्रसंगी कधी हार मानू नये अशी इच्छाशक्ती पालकांनी मुलांमध्ये निर्माण करायला हवी. या सर्व गोष्टी भविष्यात मुलांना त्यांचे लक्ष कमावण्यासाठी उपयोगी येतात.
३) मुलांच्या आवडीनिवडी जपणे :- अनेकदा पालकांद्वारे मुलांवर त्यांची स्वप्ने लादली जातात. अनेकदा वडिलांचे स्वप्न असते की मुलांनी इंजिनियर व्हावे तर आईचे स्वप्न असते की मुलांनी डॉक्टर बनावे. पण मुलांना काय बनवायचे आहे हे कोणी विचारत नाही. मूल जर मन मारून अभ्यास करीत असेल किंवा जॉब करीत असेल तर त्याची त्याची प्रगती होत नाही. त्यामुळे मुलांना त्यांच्या आवडीनुसार व गुणवत्तेनुसार त्यांचे करिअर निवडण्याची संधी द्यावी. यामुळे ते त्या ठिकाणी मन लावून काम करतात व यश प्राप्त करतात.
४) योग्य मार्गदर्शन :- मूल जर एखादा संकटात असेल तर त्यावेळी त्याला रागावण्या किंवा ओरडण्याऐवजी त्याला साथ द्या. त्यास योग्य ते मार्गदर्शन द्या. पहिल्याच वेळी मुलं यशस्वी होईल असं नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रेशर न करता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून पुन्हा ते काम योग्य प्रकारे करण्यासाठी प्रोत्साहित करा. यामुळे त्यांचे ते काम पूर्ण करण्याची इच्छाशक्ती वाढते. व ते डिप्रेशनमध्ये जात नाहीत.