बॉलीवूड सिंगर नेहा कक्कड आणि आदित्य नारायणच्या लग्नाच्या बातम्या जानेवारी २०२० पासून चर्चेमध्ये आहेत. इंडियन आइडलमध्ये त्यांची केमिस्ट्री सोशल मिडियावर सुद्धा चांगली दिसून येत होती. नेहा कक्कड आणि इंडियन आइडलचा होस्ट आदित्य नारायण या दोघांमधील सुरु असलेल्या लग्नाच्या चर्चा अखेर संपुष्टात आल्या आहेत.

सिंगर नेहाने एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य नारायणच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे. नेहाने सांगितले कि आदित्य नारायण खूपच चांगला माणूस आहे. आदित्य खूपच चांगल्या मनाचा माणूस आहे आणि मला तुम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे कि माझा जवळचा मित्र आदित्य याचवर्षी आपल्या गर्लफ्रेंड सोबत लग्न करणार आहे.नेहा पुढे म्हणाली कि आदित्य आपल्या गर्लफ्रेंड सोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मी आदित्यला पुढच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. देव त्यांना नेहमी आनंदी ठेवो. शो मधील आपल्या प्रवासाबाबत तिने सांगितले कि, इंडियन आइडल ११ ची जर्नी खूपच चांगली राहिली आहे आणि मी स्वतः खूप नशीबवान आहे कि मला विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया सारख्या लोकांसोबत स्टेज शेयर करण्याची संधी मिळाली. नेहाने दर्शकांनादेखील इंडियन आइडल ११ ला खूप प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद दिले.काही काळापूर्वी इंडियन आयडॉलच्या सेटवरुन नेहा कक्कड आणि आदित्य नारायणच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये स्टेजवर शोचे जज विशाल दादलानी नेहा-आदित्यसोबत होते जिथे पंडित मंत्रांचा उच्चार करताना पाहायला मिळाले होते. तर आदित्यचे वडील प्रसिद्ध सिंगर उदित नारायण एका मुलाखतीमध्ये त्यांचा मुलगा आदित्य आणि नेहा कक्कडच्या लग्नाच्या अफवा शोचा टीआरपी वाढवण्यासाठी केले गेलेले एक नाटक होते म्हणून सांगितले.