मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे नुकतेच तिच्या प्रियकर शार्दुल सिंह ब्यास सोबत लग्न केले. हे दोघे एकमेकांना खूप काळ डेट करत होते. नेहा व शार्दुलचे लग्न ५ जानेवारी रोजी मराठमोळ्या पद्धतीने पार पडले. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये नेहाने शार्दुल संबंधित काही माहिती मीडियासमोर दिली. त्यात तिने सांगितले की शार्दुलचे या आधी दोनदा लग्न झाले असून तो घटस्पोटीत आहे. शिवाय त्याला दोन गोड मुलं देखील आहेत.

या गोष्टीवर नेहाला लोकांनी खूप ट्रोल देखील केले. नेहाने स्पॉटबॉय डॉट कॉम सोबत बोलताना असे सांगितले की शार्दुल चे या आधीही दोनदा लग्न झाली आहेत आणि या दोन्ही लग्नापासून त्याला एक एक मुली आहेत. त्याने या बाबतीत माझ्यापासून काहीच लपवलेले नाही. जेव्हापासून मी त्यांना ओळखायला लागली तिथपासून त्याच्याबद्दल सगळ मी जाणते.मला ह्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही कारण आपले आयुष्य तिथेच थांबत नाही. शार्दुल खूप व्यवस्थित रित्या सगळे सांभाळून घेतात. सुरुवातीला शार्दुल थोडे गंभीर होते. परंतु या आधीच्या माझा ब्रेकअप मुळे मी खूप काही अनुभवले होते त्यामुळे मला असे वाटले की शार्दुल त्यांच्या कामाशी निष्ट राहतात.

अगदी दुसऱ्या-तिसऱ्या मुलाखतीमध्ये शार्दुलने मला सरळ सांगितले होते की मी तुला डेट करू इच्छितो आणि हीच गोष्ट मला त्यांची खूप आवडली होती. यावर मी उत्तर दिले होते की मी आता ३५ वर्षांची आहे २० वर्षांची नाही. नुसतं दिसण्यावर जाऊ नका मी वर्जिन सुद्धा नाही. लोक उगीचच घटस्फोटित असल्यामुळे सारखे चर्चा करत बसतात. मी तरी कुठे वर्जिन आहे !

त्यांनी माझ्यावर लग्नासाठीचा विश्वास दाखवला हिच मोठी गोष्ट आहे. नाहीतर या आधी काहीजण माझ्यासोबत नात्यात होते पण लग्नाचा विषय निघाला की ते गायब व्हायचे. नेहाने तिच्या आधीच्या रिलेशन बद्दल पण सांगितले की ती या आधी तिनदा रिलेशन शीप मध्ये होती पण ती तीनही रिलेशन जास्त काळ टिकू शकली नाही आणि या तुटलेल्या नात्यांमुळेच मी जास्त खंबीर बनत गेली.नेहाने तिच्या करीयर ची सुरुवात कैप्टेन हाउस या मालिकेपासून केली होती. त्यानंतर अनेक मालिकांमधून ती दिसली. पड़ोसन’, ‘हसरतें’, ‘मीठी मीठी बातें’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘फैमिली टाइल विद कपिल शर्मा’ या तिच्या काही मालिका आहेत. मालिका व्यतिरिक्त नेहाने काही सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. १९९९ मध्ये आलेल्या प्यार कोई खेल नही या चित्रपटामध्ये पहिल्यांदा नेहाने काम केले होते. या व्यतिरिक्त दाग द फायर’, ‘दीवाने’, ‘तुमसे अच्छा कौन है?’ आणि ‘देवदास’ या चित्रपटात नेहा दिसली होती.