हे कलाकार करोडोंच्या संपत्तीचे मालक असून देखील कधीच व्यसन करत नाहीत ! 

3 Min Read

आजकाल व्यसन हे स्टाईल मारण्यासाठी केले जाते. तरुणाईच्या हातात थोडा पैसा खेळायला लागला की ते लगेच दारू सिगरेट यांसारख्या गोष्टीचे सेवेन करून उडवतात. परंतु यांसारखे व्यसन शरीरासाठी हानीकारक आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र व्यसनासारख्या हानीकारक गोष्टींपासून ते स्वतःला लांब ठेवतात.

१) अमिताभ बच्चन – अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाते. काहीजण तर त्यांना आयडॉल देखील मानतात. अमिताभ यांनी त्यांच्या जीवनात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यामधून त्यांनी बक्कळ पैसा कमावला. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ यांच्याकडे सध्या २८३८ करोडो रुपयांची संपत्ती आहे. १९८४ मध्ये आलेला शराबी हा अमिताभ यांचा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ यांनी एका दारूड्याची भूमिका निभावली होती. त्यांनी ही भूमिका इतकी समरसून केली होती की प्रेक्षकांना अगदी ते खरेखुरे दारुडे वाटले होते. परंतु वैयक्तिक आयुष्यात मात्र अमिताभ दारू सिगारेट यांसारख्या अमली पदार्थ पासून चार हात लांब असतात. त्यांना अशा व्यसनांचे सेवन करणे अजिबात आवडत नाही.
२) अक्षय कुमार – बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या फिटनेस साठी खूप प्रसिद्ध आहे. बॉलीवूड मधील एका चित्रपटात काम करण्यासाठी अक्षयला करोड रुपये फी मिळते ‌. अक्षय त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच दारू सिगरेट पित नाही. तो त्याच्या फिटनेससाठी इतका शिस्तप्रिय आहे की तो दररोज सकाळी चार वाजता उठून व्यायाम करतो व रोज रात्री ठीक नऊ वाजताच झोपतो.
३) जॉन अब्राहम – बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री मध्ये आपल्या पिळदार शरीरयष्टी साठी प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम. चित्रपटांमधील त्याचे जबरदस्त स्टंट प्रेक्षकांना नेहमीच पसंत पडतात. २००७ मध्ये जेव्हा जॉन नो स्मोकिंग या चित्रपटाचे शूटिंग करत होता. तेव्हा चित्रपटाच्या गरजेसाठी व भूमिका नीट निभावण्यासाठी त्याला दिवसाला नव्वद सिगरेट ओढाव्या लागल्या होत्या. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर जेव्हा जॉन ने त्याच्या छातीचा एक्स-रे काढून घेतला. तेव्हा त्याला माहित पडले की अतिप्रमाणात सिगरेट ओढल्यामुळे त्याची फुप्फुसे पूर्णपणे काळी पडली आहेत. त्यानंतर मात्र स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कधीही सिगरेट व दारुला हात लावला नाही.
४) दीपिका पदुकोण – दीपिका चे नाव आता टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. शिवाय तिचे नाव श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत देखील समाविष्ट आहे. दिपीकाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. नुकताच तिचा छपाक हा चित्रपट प्रदर्शित झाला. तिने बॉलीवूड चित्रपटांसोबतच हॉलीवूड मध्ये देखील काम केले आहे. दीपिका एवढे श्रीमंतांना प्रसिद्ध असून देखील कधीही अमली पदार्थांचे सेवन करीत नाही.
५) शिल्पा शेट्टी – ९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे तिच्या फिटनेस साठी नेहमीच प्रसिद्ध आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी शिल्पा नेहमी योगा व डाएटचा अवलंब धरत असते. या सर्व गोष्टींमुळेच शिल्पा अजूनही तितकीच सुंदर दिसते जितकी ती आधी दिसायची. मसालेदार पदार्थांसोबत असं शिल्पा दारू सिगारेट यांसारख्या गोष्टींपासून देखील दूर राहणे पसंत करते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *