बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने खूपच कमी काळामध्ये बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीला तीच्या डांसमुळे जास्त ओळखले जाते. आज नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. पण नोराचा बॉलीवूड अभिनेत्री बनण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्याचबरोबर नोरा फतेहीला बॉलीवूडमध्ये डेब्यू करताना खूपच समस्यांचा सामना करावा लागला होता.

अभिनेत्री नोराचे कुटुंबीय रूढी आणि परंपरावादी होते आणि तिच्या कुटुंबामध्ये तिला कोणीही सपोर्ट केले नव्हते. यामुळे तिने काही काळासाठी वेटरचे कामदेखील केले होते इतकेच नव्हे तर तिला लॉटरीदेखील विकावी लागली होती. काळ बदलला आणि तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली परंतु तिला व्यवस्थित हिंदी बोलायला येत नव्हते त्यामुळे तिची खिल्ली उडवली जायची. यानंतर तिला बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तिचे पूर्ण आयुष्याच बदलून गेले.नोराची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्यामुळे तिने अनेक प्रकारची कामे केली जेणेकरून तिचे कुटुंब चालू शकेल. नोराने सांगितले कि तिने वयाच्या १६ व्या वर्षी काम करायला सुरवात केली होती आणि ती आधी अभ्यास करायची आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ती कामाला जायची. कारण तिच्या घरची परस्थिती ठीक नव्हती. नोरा जेव्हा भारतामध्ये आली होती तेव्हा ती खूपच कमी पैसे घेऊन आली होती. नुकतेच नोराने कोमल नाहटाच्या चॅट शोमध्ये आपल्या स्ट्रगलची स्टोरी सांगितली आहे.नोराने बॉलीवूडमध्ये रॉर: टाइगर्स ऑफ द सुंदरबंस मधून आपल्या करियरची सुरवात केली होती. यानंतर तिला स्ट्रीट डांसर ३डी, बाटला हाउस, स्त्री आणि भारत सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पूर्ण देशामध्ये ती डांसमुळे जास्त फेमस झाली आणि आज पूर्ण देशामध्ये तिचे करोडो चाहते आहेत.