पॉप्युलर वेब सीरीज मधील एक असलेली मिर्जापुर २ चा सेकंड सीजन सुरु झाला आहे. वेब सिरीजच्या मुख्य भूमिका जसे कालीन भैया, मुन्ना त्रिपाठी, गुड्डू पंडित आणि गोलू गुप्ता तर आधीपासूनच खूपच पॉप्युलर होते पण दुसऱ्या पार्टमध्ये ज्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ते आहे मुन्ना त्रिपाठीची पत्नी माधुरी यादवच्या भूमिकेने जी अभिनेत्री इशा तलवारने साकारली आहे. इशा तलवार वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर खूपच चर्चेमध्ये आली आहे.

अभिनेत्री इशाने २०१२ मध्ये मल्याळम चित्रपटामधून डेब्यू केला होता. मल्याळम शिवाय त्यांनी तेलगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. इशा तलवारचे वडील विनोद तलवार देखील अभिनेता राहिले आहेत. इशाने मुंबईच्या सेंट जेवियर्स कॉलेजमधून ग्रॅजुएशन नंतर कोरियॉग्रफर टेरेंस लुइसचा डांस क्लास जॉईन केला होता. इथे तिने बेले, जैज, हिप हॉप, सालसा सारखे अनेक डांस प्रकार शिकले आणि नंतर ती डांस स्टूडियोमध्ये ट्यूटर बनली. इशाचे म्हणणे आहे कि टेरेंस लुइसने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले.इशाने सलमान खानचा फ्लॉप चित्रपट ट्यूबलाइटमध्ये देखील एक छोटीशी भूमिका साकारली होती पण या चित्रपटामध्ये कोणाची नजर तिच्यावर पडली नाही. यानंतर इशा आयुष्यमान खुरानाच्या आर्टिकल १५ मध्ये पाहायला मिळाली होती. इशाने कलाकार संजय मिश्राच्या कामयाब आणि नुकतेच प्रदर्शित झालेल्या विक्रांत मैसी-यामी गौतमचा चित्रपट गिन्नी वेड्स सनी मध्ये देखील काम केले आहे. तर इशाने एक बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये डेब्यू केला होता. अनिल कपूर आणि ऐश्वर्या रायचा हमारा दिल आपके पास है चित्रपटामध्ये ती पाहायला मिळाली होती.
इशा तलवारजवळ सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्यामध्ये ती काम करत आहे. राकेश ओमप्रकाश मेहराच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेला तुफान चित्रपटामध्ये देखील इशा तलवार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये लीड रोलमध्ये फरहान अख्तर आणि मृणाल ठाकुर आहेत.

इशाला भलेहि लोक आता नोटीस करत आहेत पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि ती टीव्हीवरील जाहिरातींमधून खूप लोकप्रिय होत आहे. इशाने आतापर्यंत ४० पेक्षा जास्त जाहिरातींमध्ये काम केले आहे ज्यामध्ये पिज्जा हट, काया स्किन क्लीनिक, ड्यूलक्स पेंट्स सारख्या ब्रँडचा समावेश आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.