प्यार का पंचनामा चित्रपटामधून दर्शकांच्या मनामध्ये जागा निर्माण करणारी अभिनेत्री नुसरत भरुचा इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. तिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमधील तिचा अभिनय खूपच पसंद केला जातो. नुकतेच ती जनहित में जारी चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. हा चित्रपट एका अशा महिलेबद्दल होता जी घरोघरी जाऊन ‘कं डो’म विकत असते. यामुळे तिला आपल्या कुटुंबाकडून विरोध देखील सहन करावा लागतो.

चित्रपटामध्ये अभिनेत्री नुसरत भरुचाला खूप पसंद केले गेले. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची सक्सेस पार्टी देखील ठेवण्यात आली होती. आपल्या चित्रपटाच्या सक्सेज पार्टीमध्ये नुसरत भरुचा खूपच सुंदर सजून पोहोचली होती. यादरम्यान तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. नुसरत भरुचाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

जनहित में जारी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटामधील सर्व कलाकार उपस्थित होते. यादरम्यान पार्टीमध्ये नुसरत पिंक कलरचा शॉर्ट बॉडी ड्रेस घालून आली होती. या ड्रेसमध्ये नुसरत इतकी सुंदर दिसत होती कि पार्टीमध्ये सर्वांचा नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. आपल्या लुकला कंप्लीट करण्यासाठी तिने पिंक कलरचे हाई हील्स घातले होते आणि आपल्या केसांना कर्ल केले होते. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. टाईट फिटिंग ड्रेसमध्ये अभिनेत्रीचे कर्व्स स्पष्टपणे दिसत होता.

चित्रपटामध्ये ती कं’डो’म आणि फीजिकल रिलेशन सारख्या मुद्द्यांवर बोलताना दिसली होती. यासोबत चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने उघडपणे यावर बातचीत केली होती. तिने म्हंटले होते कि, मी मुंबईमध्ये मोठी झाली आहे आणि या टॉपिकवर बोलण्यास मला जरासुद्धा संकोच वाटत नाही. या विषयाबाबत मुलींमध्ये अजूनही प्रचंड संकोच आहे, ज्याला तोडणे अजून बाकी आहे.

ती पुढे म्हणाली कि, जसे मुली पॅड्स ठेवतात तसेच बॅगमध्ये कं’डो’म देखील ठेवायला हवे. यामध्ये लाजण्यासारखे काहीच नाही. आई आपणच बनतो आणि जन्म देखील आपणच देतो. आई बनायचे नसेल तर तुम्ही पार्टनरकडून प्रोटेक्शनची डिमांड करू शकता. हा तुमचा अधिकार आहे. या चित्रपटाने ओटीटीवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे आणि यासोबत अभिनेत्री नुसरतच्या पारड्यात आणखीन एक सुपरहिट चित्रपट दाखल झाला आहे.

प्यार का पंचनामा चित्रपटामधून अभिनेत्री नुसरत भरुचाने बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन देखील दिसला होता. चित्रपटाला जबरदस्त सफलता मिळाली होती. यानंतर कार्तिक आणि नुसरत आकाश वाणी आणि सोनू के टीटू की स्वीटी चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. यानंतर नुसरतने अनेक चित्रपट केले. आता ती रामसेतू चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि जॅकलीन फर्नांडीस देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत.