८० च्या दशकामधील प्रसिद्ध सिरीयल रामायण मधून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री पद्मा खन्ना आता ७१ वर्षांची झाली आहे. पद्मा खन्नाने रामायण मध्ये कैकयीची भूमिका करून अमाप लोकप्रियता मिळवली होती. पद्मा खन्ना आता या चंदेरी दुनियेपासून दूर असते. पद्मा खन्नाने आपले करियर भोजपुरी चित्रपटांपासून सुरु केले होते. तिला जॉनी मेरा नाम या चित्रपटामधून लोकप्रियता मिळाली.

या चित्रपटामध्ये तिने एक डांस नंबर केले होते. तिने आपल्या करियरमध्ये जवळजवळ ४०० पेक्षा जास्त चित्रपट केले. मात्र बहुतेक चित्रपटांमध्ये तिला डांसरचीच भूमिका मिळाली. ९० च्या दशकामध्ये पद्मा खन्नाने दिग्दर्शक एल सिडाना सोबत अग्न केले. या दोघांची भेट सौदागर चित्रपटाच्या सेटवर झाली होती.त्यावेळी जगदीश असिस्टेंट डायरेक्टर होते. बघता बघता दोघांनाहि प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले. सिडानाने अनेक चित्रपट बनवले ज्यामध्ये पद्मा खन्नानेसुद्धा काम केले. लग्नानंतर पद्मा खन्ना चित्रपटांपासून दूर गेली. सध्या ती अमेरिकेमध्ये राहते.
पद्मा खन्नाने अमेरिकेमध्ये एक इंडियन डांस अॅकॅडमी उघडली आहे, जिथे ती शास्त्रीय नृत्य शिकवते. तिच्या पतीचे निधन झाले आणि सर्व जबाबदारी तिच्यावर आली. तिला दोन मुले आहेत. पद्माला लहानपणापासूनच डांसची खूप आवड होती. तिने १२ व्या वर्षापासून स्टेजवर परफॉर्म करायला सुरवात केली. आजदेखील तिने हा छंद जोपासला आहे.