रामानंद सागर द्वारा निर्मित रामायणमधील प्रत्येक भूमिका आज सुद्धा स्मरण केली जाते. रामायणमध्ये अशीच एक भूमिका होती ती म्हणजे कैकेयीची. अभिनेत्री पद्मा खन्नाने हि भूमिका साकारली होती आणि ती इतकी उत्कृष्ठरित्या साकारली होती कि खऱ्या आयुष्यात लोक तिचा तिरस्कार करू लागले होते. एका कलाकाराची हीच खासियत असते कि लोक त्यांना त्यांच्या भूमिकेमुळे ओळखावेत. आता दूरदर्शनवर पुन्हा या मालिकेचे पुन्हा प्रसारण केले जात आहे. चला तर मग जाऊन घेऊयात पद्मा खन्ना म्हणजेच कैकेयीबद्दल.

पद्मा खन्ना आता ग्लॅमरच्या दुनियेपासून खूप दूर आहे. १९८७ मध्ये प्रसारित झालेल्या रामायणाव्यतिरिक्त पद्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिने आपल्या करियरची सुरवात भोजपुरी चित्रपटामधून केली होती. १९६१ मध्ये भैया चित्रपटामध्ये तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. १९७० मध्ये पद्मा खन्नाला जॉनी मेरा नाम या चित्रपटामधून ओळखले जाऊ लागले.पद्मा खन्नाला आजसुद्धा अमिताभ बच्चन सोबत काम केलेल्या सौदागर चित्रपटामुळे आठवले जाते. या चित्रपटाचे गाणे सजना है मुझे आजदेखील खूपच लोकप्रिय आहे. तिने वेगवेगळ्या भाषांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण जास्त करून तिला सर्व चित्रपटांमध्ये डांसरचीच भूमिका साकारायला मिळाली. यामध्ये लोफर, जान-ए-बहार, पाकीजा सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.पद्मा खन्नाने दिग्दर्शक जगदीश एल सिडाना सोबत लग्न केले. दोघांनी भेट देखील सौदागर चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्या चित्रपटाचे सिडाना असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहत होता. सिडानाने असे अनेक चित्रपट बनवले ज्यामध्ये पद्माने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.लग्नानंतर पद्माने चित्रपटांमध्ये काम करने सोडून दिले आणि ती अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. तिथे तिने इंडियनिका नृत्य अकादमी सुरू केली आणि शास्त्रीय नृत्य शिकवू लागली. तिला लहानपणापासूनच नृत्याची खूपच आवड होती. पद्माने वयाच्या ७ व्या वर्षापासून कथ्थक नृत्य शिकायला सुरवात केली होती. पतीच्या निधनानंतर पद्मा मुलांच्यासोबत मिळून डांस अकादमी सांभाळते. पद्माला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.