बॉलीवूड फिल्मी जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा जबरिया जोड़ीमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत पहायला मिळाली होती. दोन्हीहि कलाकारांनी या चित्रपटाचे खूपच जोमाने प्रमोशन केले होते. अशामध्ये परिणीती चोप्राने द कपिल शर्मा शो मध्ये आपल्या मनातली गोष्ट सांगितली होती. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत जबरिया जोड़ीच्या प्रमोशनसाठी आली होती आणि इथे एका सीनमध्ये दाखवले गेले होते कि ३ मुलांच्या बापासोबत परिणीती चोप्राला जबरदस्ती लग्न करायचे आहे. पण असे होणे शक्य आहे?जबरिया जोड़ी चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा एकदम वेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळाले होते. या शोमध्ये होस्ट कपिल शर्माने जेव्हा परिणीतीला विचारले होते कि इंडस्ट्रीमध्ये असा कोणता अभिनेता आहे ज्याच्यासोबत संधी मिळाली तर जबरदस्ती लग्न करू शकशील.याचे उत्तर देताना परिणीतीने सांगितले कि जर तिला संधी मिळाल्यास सैफ अली खानसोबत ती लग्न करू शकेल. तिला सैफ अली खान खूपच पसंत आहे आणि परिणीती त्याच्यावर खूप प्रेम करते. जेव्हा कपिलने विचारले कि करीनाला प्रॉब्लेम होईल तेव्हा परिणीती म्हणाली कि तिचे बोलणे झाले आहे आणि आणि तिला काहीच अडचण नाही.असा प्रश्न जेव्हा सिद्धार्थला विचाला गेला तेव्हा त्याने तैमुरचे नाव घेतले. सिद्धार्थला तैमुर खूपच क्युट वाटतो. याशिवाय देखील कपिल शर्माने परिणीती आणि सिद्धार्थसोबत अनेक टॉपिक्सवर बातचीत केली आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीचे उघडपणे उत्तर दिले. सिद्धार्थ मल्होत्राने २०१२ मध्ये स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती तर २०११ मध्ये परिणीतीने लेडीज वर्सेज रिकी बहल चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.