सैफ अली खान नेहमी कुटुंबासोबत सुट्ट्या घालवण्यासाठी आपले मूळ गाव पटौदी येथील इब्राहिम पॅलेसमध्ये जात असतो. सैफ व्हेकेशनसाठी लंडनला सुद्धा जातो. परंतु अनेक वेळा सैफला करीना आणि तैमुर सोबत पटौदी पॅलेसमध्ये इंजॉय करताना पाहायला मिळाला आहे. सैफ आणि करीना अनेक वेळा इब्राहिम पॅलेसच्या बाहेरचे फोटो शेयर करत असतात. पण पटौदी पॅलेसच्या आतले फोटो तुम्ही क्वचितच पाहिले असतील, जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

खूपच आलिशान आहे पटौदी पॅलेस :- पटौदी पॅलेस हरियाणाच्या गुरूग्राम पासून जवळ जवळ २६ किलोमीटर दूर आहे. हा पॅलेस ८० वर्षांपूर्वी बनवण्यात आला होता. असे म्हंटले जाते कि पटौदी पॅलेस १९३५ मध्ये आठवे नवाब आणि पूर्व भारतीय क्रिकेटर इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी बांधला होता. या आलिशान महालामध्ये १५० खोल्या आहेत. याशिवाय या महालामध्ये सुखसोईच्या सर्व सुविधा आहेत. पटौदी पॅलेसच्या समोर एक मोठा स्विमिंग पूल आहे. या पॅलेसमध्ये चित्रपटांची शुटींग देखील झाली आहे. तैमुरचा पहिला वाढदिवस इथेच साजरा करण्यात आला होता. या पॅलेसमध्ये सैफ अली खानच्या वडिलांची समाधीसुद्धा आहे. नवाब पटौदीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना इथेच दफन करण्यात आले होते. असेसुद्धा म्हंटले जाते कि पटौदी घराण्याच्या पूर्वजांच्या कबरेही येथे आहेत. पूर्वी हा पॅलेस इब्राहिम कोठी म्हणून देखील ओळखला जात होता.