जहां चार यार चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अभिनेत्री पूजा चोप्रा खूपच चर्चेमध्ये आली आहे. पूजाने आपल्या पर्सनल लाईफसंबंधी मोठा खुलासा केला आहे. पूजा चोप्राने मुलाखतीदरम्यान आपल्या वेदना व्यक्त करताना सांगितले कि जेव्हा तिच्या आईने तिला जन्म दिला होता तेव्हा घरामध्ये शोककळा पसरली होती.

पूजाच्या वडिलांना मुलगा हवा होता, पण जेव्हा घरामध्ये मुलगी जन्माला आली तेव्हा तिचे वडील बाहेर गेले होते. पुजानुसार तिचे वडील म्हणायचे कि त्यांना मुलगी नको आहे, तर मुलगा हवा आहे. पूजाच्या वडिलानी इतके देखील म्हंटले होते कि तिला अनाथाश्रमात देऊन टाका किंवा मारून टाका.

सध्या पूजा चोप्रा तिच्या आगामी जहां चार यार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. अभिनेत्री पूजा चोप्रा सर्वात पहिला कमांडो चित्रपटामध्ये दिसली होती. जहां चार यार चित्रपटामध्ये तिच्यासोबत स्वरा भास्कर, मेहर विज आणि शिखा तनसानिय देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. १६ सप्टेंबरला रिलीज होणार्या या चित्रपटासाठी पूजा देशभरामध्ये फिरून चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

पूजा चोप्राने मुलाखतीदरम्यान सांगितले कि जेव्हा ती जन्माला आली होती तेव्हा तिचे वडील खूप नाराज झाले होते, त्यांनी आपला हेतू स्पष्ट केला होता. त्यादरम्यान पूजाचे वडील म्हणाले कि मला मुलगी नको आहे. तिला अनाथाश्रमात देऊन टाका किंवा मारून टाका.

पूजाने याचा खुलासा करताना सांगितले कि तिची एक ७ वर्षाची मोठी बहिण होती, दुसऱ्या मुलीनंतर तिच्या वडिलांनी तिच्या आईला सांगितले होते कि त्यांना मुलगी नको आहे, तर मुलगा हवा आहे. यानंतर तिच्या आईने घाबरून तिला आणि तिच्या मोठ्या बहिणीला घेऊन माहेरी निघून आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Chopra (@poojachopraofficial)

मुलींचा सांभाळ करण्यासाठी तिने नोकरी करायला सुरुवात केली. ती सकाळी लवकर निघून जायची आणि रात्री उशिरा घरी परत यायची. लहान मुलगी पूजा जेव्हा रडायची तेव्हा शेजारची एक महिला तिला स्वतःचे दुध पाजवून तिची भूक भागवायची.