१० वी १२ वी पास पोस्ट विभागामध्ये सरकारी नोकरी ६९००० पर्यंत सॅलरी, कसा करावा ऑनलाईन अर्ज जाणून घ्या !

2 Min Read

सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. लवकरच पोस्ट विभागामध्ये बंपर भरती सुरु होणार आहे. पोस्ट विभागामध्ये हि तरुणांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे ज्यामध्ये तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

भारतीय पोस्ट विभागाने महाराष्ट्र पोस्ट सर्कलसाठी १३७१ पदांसाठी मेगा भरती काढली ज्यामध्ये पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी योग्य आणि इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात. खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून अर्ज भरा :- https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/

पोस्ट विभागाकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. योग्य उमेदवार १० नोवेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. पोस्ट विभागाकडून भरती उमेदवारांची संगणक आधारित चाचणी घेण्यात येईल. याच आधारावर उमेदवारांना नोकरी मिळेल.पात्रता काय असेलः पोस्ट विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या रिक्त जागांसाठी पोस्टमन आणि मेल गार्डची देखील व्हेकेंसी आहे. यासाठी अर्ज करणार्यांमना बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराची स्थानिक भाषा मराठी अवगत असली पाहिजे किंवा मराठी भाषेची माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय मल्टी टास्किंग स्टाफच्या देखील जागा आहे. ज्यासाठी उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी भाषेची माहिती असणे आवश्यक आहे.

सॅलरी किती मिळेल :- पोस्ट विभागाकडून या पदांसाठी सॅलरी याप्रकारे निर्धारित करण्यात आली आहे. पोस्टमन आणि मेलगार्ड उमेदवाराला २१७०० रुपये पासून ६९१०० रुपये दरम्यान वेतन आणि भत्ता दिला जाईल, तर मल्टी टास्किंग स्टाफला १८००० पासून ५६९०० पर्यंत वेतन आणि भत्ता दिला जाईल.

रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख :- रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख १० नोवेंबर २०२० देण्यात आली आहे. तथापि याआधी अंतिम तारीख ३ नोवेंबर ठेवण्यात आली होती. पण पोस्ट विभागाकडून यामध्ये बदल करण्यात आला आहे आणि शेवटची तारीख वाढवून १० नोवेंबर करण्यात आली आहे.काय असेल वयोमर्यादा :- वरील दिलेल्या तीन पदांसाठी पोस्ट विभागाकडून वयोमर्यादा १८ पासून २७ वर्षे ठेवण्यात आली आहे आणि वयमर्यादा ३ नोवेंबर २०२० पर्यंत वयसीमेच्या आधारावर होईल. म्हणजे जो ३ नोवेंबर पर्यंत १८ वर्षे पूर्ण करत आहे आणि ज्याचे वय ३ नोवेंबर पर्यंत २७ वर्षाच्या आतमध्ये आहे तोच उमेदवार या पदांसाठी पात्र राहील. अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगरी आणि अनारक्षित उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. त्याचबरोबर एसटी, एससी आणि मागासवर्गीयांना १०० रुपये शुल्क आकारले जाईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *