साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या लग्नाबद्दल नेहमीच सोशल मिडियावर चर्चा रंगत असतात. अनेकवेळा त्याच्याविषयी काहीना काही व्हायरल होतच असते. जेव्हा प्रभासचा बाहुबली हा चित्रपट आला होता तेव्हा असा अंदाज लावला गेला होता कि प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे अफेयर चालू आहेत आणि लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत.नंतर या सर्व बातम्या निव्वळ अफवा निघाल्या, पण आता प्रभासचे नाव आणखीन एका अभिनेत्रीसोबत जोडले जाऊ लागले आहे. नुकतेच एक बातमी समोर आली आहे आणि प्रभासचे ज्या अभिनेत्रीसोबत नाव जोडले जाऊ लागले आहे त्या अभिनेत्रीचे नाव निहारिका कोनिडेला असे आहे . निहारिका सुद्धा साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि बऱ्याच काळापासून तिच्या आणि प्रभासच्या लग्नाबद्दल बातम्या सोशल मिडियावर शेयर होत आहेत.निहारिकाने आतापर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ५ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिची फॅन फॉलोइंग देखील खूपच चांगली आहे. इतकेच नाही तर निहारिकाचे संपूर्ण कुटुंब फिल्मी कलाकारांनी भरलेले आहे. निहारिका साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील मेगास्टार चिरंजीवी आणि अभिनेता कल्याणची भाची आहे. याचबरोबर ती सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि राम चरणची कजन आहे. निहारिकाने २०१६ मध्ये ओका मनासु या चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. याशिवाय तिने चित्रपटांसोबतच वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे.बऱ्याच काळापासून निहारिकाचे नाव प्रभास सोबत जोडले जाऊ लागले आहे. त्यांच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या समोर आल्या होत्या. पण या सर्व गोष्टी नाकारताना स्वतः निहारिकाने सांगितले आहे कि तिला स्वतःच माहिती नाही कि तिच्या लग्नाबद्दल बातम्या समोर येत आहेत. तिने या सर्व बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले आणि म्हणाली कि सध्या तिच्या करियरवर फोकस करत आहे.याआधी प्रभासचे नाव अनुष्का शेट्टीसोबत जोडले गेले होते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि अनेक वेळा त्यांना एकत्र पाहिले गेले आहे. पण त्यांच्या अफेयरच्या बातम्या खोट्या निघाल्या. निहारिकासोबत लिंकअपच्या बातम्यांबद्दल प्रभासने कोणतेही विधान केलेले नाही.