साउथचा सुपरस्टार डांसर प्रभू देवा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि एक उत्कृष्ठ अभिनेता आहे. प्रभू देवाने वांटेड, राउडी राठौर, अॅ्क्शन जॅक्सन अशा सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पण प्रभू देवाने आपल्या करियरची सुरवात एक बैकग्राउंड डांसर म्हणून केली होती. नुकताच प्रभू देवाचा वाढदिवस होऊन गेला आहे. प्रभू देवा आता ४६ वर्षांचा झाला आहे. ०३ एप्रिल १९७३ रोजी प्रभू देवाचा जन्म झाला होता.

प्रभू देवाचे लग्न रमलत सोबत झाले होते जी एक मुसलमान होती. पण लग्नानंतर तिने मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता आणि आपले नाव बदलून लता ठेवले होते. लग्नानंतर प्रभू देवाला तीन मुले झाली. परंतु मोठा मुलगा विशालचा कर्करोगामुळे दुर्देवी मृत्यू झाला. प्रभू देवा आणि नयनताराच्या अफेयरच्या बातमीमुळे लता आणि प्रभू देवा यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि हे दोघे घटस्फोट घेऊन वेगळे झाले.प्रभू देवा आणि लता यांनी एकमेकांना घटस्फोट देवून वेगळे झाले. नयनताराला सुद्धा प्रभू देवासोबत लग्न करायचे होते. यासाठी तिने आपले फिल्मी करियर देखील सोडले होते. ती आपल्या खर्चासाठी प्रभुदेवावर अवलंबून झाली होती. दोघेही मुंबईमध्ये राहायला लागले होते.नयनताराने प्रभू देवासोबत लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तन देखील केले होते पण २०१२ मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघेही वेगळे झाले. २०१६ मध्ये प्रभू देवाला अर्धांगवायूचा झटका आला होता. खरे तर एका चित्रपटाच्या गाण्याची कोरियोग्राफी करत असताना तो जमिनीवर कोसळला. प्रभू देवा काही काळानंतर ठीक झाला आणि पुन्हा कोरियोग्राफीमध्ये सक्रीय झाला. प्रभू देवाने आज बॉलीवूडमधील चांगले नाव कमवले आहे. आज तो एक उत्कृष्ठ कोरियोग्राफर, डांसर, दिग्दर्शक, निर्माता आणि एक अभिनेता आहे.