बॉलीवुडची डिंपल गर्ल अभिनेत्री प्रीति जिंटाला आज कोणाच्याही ओळखी गरज नाही. प्रीतिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहेत. डिंपल गर्ल प्रीतिला बॉलीवुड मध्ये २० वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रीतिने क्या कहना चित्रपटामधून बॉलीवूडमधील करियरची सुरुवात केली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटामध्ये प्रितीने एक अनमॅरिड टीनेज प्रेग्नंटची भूमिका साकारली होती. प्रीतिने या चित्रपटाबद्दल आपला अनुभव शेअर केला आहे.अभिनेत्री प्रीतिने असे सांगितले की जेव्हा हा चित्रपट तिने करण्याचा विचार केला होता तेव्हा लोकांचे रिअॅक्शन काय होते. प्रीतिने लिहिले कि, मला आठवते जेव्हा मी एक अनमॅरिड आईची भूमिका करणार होते. त्यावेळी माझा हा निर्णय ऐकून सर्वांना धक्काच बसला काही जण तर मला म्हणाले कि तू वेडी आहेस, करियर सुरु होण्या अगोदरच तुझे करियर संपुष्टात येईल.प्रीतिने पुढे लिहिले कि, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा रमेश तुरानी आणि हनी आंटीला मी धन्यवाद म्हणून इच्छिते, कारण त्यांनी मला हा चित्रपट दिला. तसेच माझ्या दोन्ही स्टार्स सैफ अली खान आणि चंद्रचूर सिंह यांची देखील आभारी आहे. ज्यांनी मला सपोर्ट केले.प्रीतिने शेवटी लिहिले कि, या चित्रपटा पासून मला शिकायला मिळाले कि लोक काय म्हणतात याचा विचार करण्यापेक्षा आपल्या मनाचे ऐका. प्रीतिच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती भैयाजी सुपरहिट या चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अमीषा पटेल, सनी देओल आणि अरशद वारसी मुख्य भुमिकेमध्ये होते.