मोहब्बतें चित्रपटामध्ये किरणच्या भूमिकेमध्ये दिसणारी प्रीती झंगियानीने इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमवले पण ती जास्त लोकप्रिय होऊ शकली नाही. प्रीती झंगियानीने अभिनय करियरची सुरुवात चांगली केली होती. साउथ इंडस्ट्रीमध्ये देखील तिने खूप काम केले. मोहब्बतें चित्रपटामधून तिने डेब्यू केला होता. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण प्रीतीच्या लाईफमध्ये अशी वेळ आली कि ऑडियन्सने तिच्या कामाला पसंती देणे बंद केले. प्रीती झंगियानीने देखील आपल्या पर्सनल लाईफमध्ये फोकस केले. आज प्रीती झंगियानी उद्योजिका आहे. मुंबईमध्ये ती नेहमी इवेंट्समध्ये पाहायला मिळते.

नुकतेच प्रीती झंगियानी एका इवेंटमध्ये स्पॉट झाली होती. शिमरी व्हाईट स्ट्रॅपी थाई हाय स्लिट ड्रेस, हेवी मेकअपसोबत पिंक लिपस्टिक, कानामध्ये व्हाईट पर्ल्स, डायमंड रिंग्ससोबत प्रीतीने आपला लुक कम्प्लीट केला होता. कंबरेला चांदीची चैन आणि व्हाईट सिल्वर पर्स बांधला होता. केसांना बन करून बांधले होते. पहिल्यापेक्षा प्रीती झंगियानीचा लुक खूपच बदलला आहे. २२ वर्षानंतर तिच्या लुकमध्ये खूपच फरक पाहायला मिळत आहे. प्रीती झंगियानी जेव्हा आई बनली होती तेव्हा तिचे वजन खूप वाढले होते. काम केल्यानंतर प्रीती झंगियानी आता खूपच फिट दिसत आहे.

प्रीति झंगियानी आणि तिचा पती प्रवीण दबास एक स्पोर्ट्स लीग सक्सेसफुली रन करत आहेत. सोशल मिडियावर प्रीती झंगियानी खूपच सक्रीय राहते. तिची फिटनेस आणि बदललेला लुक, याचा पुरावा आहे कि ती पहिल्यापेक्षा खूपच बदलली आहे. मोठ्या पडद्यावर प्रीति झंगियानी ९० च्या किड्सनी जितके सिम्पल पाहिले रियल लाईफमध्ये ती तितकीच ग्लॅमरस आहे. प्रीति झंगियानी आता दोन मुलांची आई आहे.

सोशल मिडियावर आपल्या वर्कआउटचे व्हिडीओ आणि फोटोज ती चाहत्यांसोबत शेयर करताना पाहायला मिळत असते. याशिवाय व्हेकेशनचे देखील फोटोज प्रीति झंगियानी कुटुंबासोबत शेयर करते. मोहब्बतें अभिनेत्रीने जिम्मी शेरगिल सोबत स्क्रीन शेयर केली होती. २००२ मध्ये अवारा पागल दीवाना, २००४ मध्ये आन आणि २००७ मध्ये व्हिक्टोरिया नंबर २०३ मध्ये ती दिसली होती.
प्रीति झंगियानी ने शाहरुख खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत अनेक मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेयर केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता ती कोणत्याही चित्रपटामध्ये दिसत नाही. मोठ्या पडद्यावर पुनरागमनबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली कि, मला अभिनय क्षेत्रामध्ये परत यायचे आहे, जर मला एखादी चांगली भूमिका मिळाली तर मी त्याबद्दल विचार करेन.