बॉलीवूडमध्ये आपण अनेक विवाहित कपल पाहिले असतील. यामध्ये शाहरुख़ गौरी खान, अक्षय ट्विंकल कुमार, काजोल अजय देवगन आणि ऐश्वर्या अभिषेक बच्चन असे दिग्गज कलाकार सामील आहेत. तथापि काही कलाकार असे आहेत ज्यांच्या पत्नींबद्द्द्ल खूपच कमी लोकांना माहिती आहे. आज आपण बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत.

१७ डिसेंबर १९७२ रोजी मुंबई येथे जन्मलेला जॉन आता ४५ वर्षांचा झाला आहे. इतके वय होऊन देखील जॉन खूपच फिट आहे. तो आपल्या आरोग्याबद्दल आणि बॉडीबद्दल नेहमी सतर्क असतो. त्याच्या मसल्स आणि बॉडीच्या चर्चा चित्रपटांमध्ये येताच सुरु झाल्या होत्या. जॉन चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी मॉडलिंग करत होता. जॉनचा बॉलीवूडमध्ये पहिला चित्रपट जिस्म होता जो २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये जॉनने अभिनेत्री बिपाशा बसुसोबत काम केले होते. या चित्रपटानंतर बिपाशा बसु आणि जॉन एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. मिडियामध्ये त्यांना सुपरकपल म्हणून ओळखले जाऊ लागले होते. जॉन आणि बिपाशा यांचे हे रिलेशन ९ वर्षे सुरु होते. जिथे एकीकडे बिपाशाने अभिनेता करण सिंह ग्रोवर सोबत लग्न केले तर दुसरीकडे जॉनसुद्धा प्रिया रुंचालसोबत विवाहबद्ध झाला.प्रिया एक एनआरआई आहे जी अमेरिकेमध्ये एक फाईनेंसियल एनालिस्ट आणि इन्वेस्टमेंट बँकर म्हणून काम करते. २०१० मध्ये जॉन आणि प्रियाची भेट झाली होती त्यानंतर त्यांची मैत्री प्रेमामध्ये बदलली आणि ३ जानेवारी २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात दोघांनी आपला विवाह सोहळा साजरा केला होता.सध्या जॉन आणि प्रियाचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये जॉन आणि प्रिया एकमेकांच्या सोबत चांगला वेळ व्यतीत करताना दिसत आहेत. तसे तर जॉन आपल्या चित्रपटांच्या शुटींगमध्ये नेहमी व्यस्त असतो पण त्याचबरोबर कामातून वेळ काढून तो आपली पत्नी प्रियासोबत व्हेकेशन वर सुद्धा जातो. अशाचा एका व्हेकेशनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.मध्यंतरी अशी बातमी समोर आली होती जॉन आणि प्रियामध्ये मतभेद सुरु झाले आहेत तथापि याबद्दल दोघांनी अजून उघडपणे मत व्यक्त केले नाही. जॉनने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि त्याला आपल्या पर्सनल लाइफबद्दल कोणतीही गोष्ट शेयर करायला नाही आवडत. प्रिया एक सेलिब्रिटी वाईफ असून देखील बॉलीवूडमधील लाईम लाईटपासून दूर राहणे पसंत करते.