लग्नाच्या ११ महिन्यानंतर प्रियांका चोपडाने बेडरूमचे उघड केले खुलासे, सांगितल्या पतीच्या विचित्र सवयी !

2 Min Read

देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोपडाने गेल्या डिसेंबरमध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले होते. दोघांनी एक आणि दोन डिसेंबरला जोधपुरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये विधिवत लग्न केले होते. दोघे लग्नानंतर सोशल मिडियावर आपल्या फोटोज द्वारे नेहमी चर्चेमध्ये राहत असतात. आता देसी गर्लने लग्नाच्या नऊ महिन्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. कधी कधी दोघे एकमेकांचे कौतुक करत असतात तर कधी एकमेकांची चेष्टा करत असतात.नुकतेच ऑनलाईन मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोपडाने आपला पती निक जोनासबद्दल अनेक पर्सनल गोष्टी शेयर केल्या. यादरम्यान प्रियांका चोपडाने आपल्या लग्नाच्या नऊ महिन्यानंतर बेडरूमबद्दल अनेक खुलासे केले. तिने सांगितले कि बेडरूममध्ये तिचे आणि निकचे रिलेशन कसे आहे. प्रियांकाने हे देखील सांगितले कि निक मला जेव्हा असा पाहतो तेव्हा मी म्हणते कि, एक मिनिट थांब, मी थोडा मेकअप करते. मी झोपेमध्ये असते, पण तो तरीही पाहत असतो. तो खूपच अमेझिंग आणि सुपरस्वीट आहे. माझे डोळे त्यावेळी खूपच भारी असतात पण त्याला ते खूप क्युट वाटतात. प्रियांकाला निकची हि सवय थोडी विलक्षण वाटते कि तिला इतके प्रेम करणारा लाईफ पार्टनर मिळाला आहे. मुलाखती दरम्यान देसी गर्लला विचारले गेले कि निक तिच्या मेकअप आणि स्टाईलबद्दल काय विचार करतो. यावर प्रियांका चोपडाने म्हंटले कि त्याला तिची स्टाईल आणि मेकअप दोन्ही पसंत आहेत. अनेक प्रसंगी त्याला तिच्या नॅचरल गोष्टी खूप आवडतात. प्रियांका सांगते कि निक तिच्या मेकअपपासून स्टाईलिंगपर्यंत सर्व गोष्टींचे कौतुक करतो आणि तिचा कॉन्फिडेंट यामुळे आणखीनच वाढतो.

निक जोनास आणि प्रियांका दोघेही आपल्या आपल्या प्रोजेक्ट्समध्ये खूपच बीजी राहतात. असे असून देखील दोघे एकमेकांना वेळ द्यायला विसरत नाहीत. दोघे एकमेकांसाठी वेळ काढतात आणि एकत्र फिरायला जातात. अभिनेत्री प्रियांकाचा एक हॉलीवुड चित्रपट व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने रिलीज झाला होता, ज्याचे नाव इस नोट ईट रोमांटिक आहे. तर दुसरीकडे बॉलीवूड चित्रपट द स्काई इज पिंक मध्ये देखील प्रियांका पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील पाहायला मिळाले होते.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *