प्रियांका चोप्रा आणि पॉप सिंगर निक जोनसचे लग्न होऊन एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. सध्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात रोमँटिक आणि ग्लॅमरस कपल्सपैकी हि एक जोडी आहे. सोशल मिडियावर दोघे खूपच अॅयक्टिव असतात नेहमी दोघे आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहत असतात. कोरोना व्हायरसच्या या संकटादरम्यान दोघे आपली डेट एनिवर्सरी साजरी करत आहेत. दोघे एकमेकांसोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करतात. नुकतेच दोघांनी एकमेकांसाठी एक स्पेशल पोस्ट शेयर केली आहे, जी त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.प्रियांका चोप्राने आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये त्या दिवसांची आठवण काढली आहे जेव्हा एकत्र एक फोटो काढला होता. प्रियांकाने फोटोज शेयर करून कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मी आणि निकने पहिल्यांदा एकत्र फोटो क्लिक केला होता. त्या दिवसानंतर प्रत्येक दिवस तू माझ्या आयुष्यामध्ये खूपच आनंद घेऊन आला आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आपल्यासोबत माझे आयुष्य अद्भुत बनवण्यासाठी निक जोनस तुझे आभारी आहे. अजून आपल्याला खूप मोठा प्रवास पार करायचा आहे.या फोटोंमध्ये दोघांमध्ये एक साम्य होते. दोघे खूपच स्टाइलिश दिसत होते आणि दोघांनी कॅप्स परिधान केल्या आहेत. निकने या फोटोंवर कमेंट करताना लिहिले आहे कि, माझ्या आयुष्यामधील सर्वात खास हि दोन वर्षे.निक जोनसने प्रियांका चोप्रासोबत एक फोटो शेयर केला आहे. त्याने आपल्या पहिल्या भेटीच्या आठवणी ताज्या करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, २ वर्षांपूर्वी या सुंदर महिलेसोबत मी पहिल्यांदा डेटवर गेलो होतो. हि २ वर्षे माझ्या आयुष्यामध्ये सर्वात शानदार दोन वर्षे राहिली आहेत. याचा विचार देखील मला एक सुखद अनुभूती देतो कि मी किती सौभाग्यशाली आहे कि तुज्यासोबत संपूर्ण आयुष्य मला घालवायचे आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. २ वर्षांच्या शुभेच्छा. आई लव यू बेब. लॉकडाउनमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस एकत्र क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत.
निकला प्रियांकाशी पहिल्या नजरेमध्ये प्रेम झाले होते. त्याने प्रियांकाला एका पार्टीमध्ये पाहिले होते. एका मुलाखतीमध्ये निकने याचा स्वीकार देखील केला आहे. त्याने सांगितले होते कि द वैनिटी फेयर ऑस्कर्स पार्टीमध्ये पहिल्यांदा प्रियांकाला पाहून मी फिदा झालो होतो. २०१७ मध्ये मेट गालाच्या काही महिन्यांपूर्वीच या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.