२००० मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तिने हा मोठा कारनामा केला होता. आज प्रियांका देशामध्येच नाही तर जगामध्येमध्ये देखील खूपच लोकप्रिय झाली आहे. पण ते म्हणतात ना यश मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असाच प्रियांकाच्या आयुष्याशी संबंधित एक किस्सा आम्ही सांगणार आहोत.भारती एस प्रधानने प्रियंका चोपड़ा : द डार्क हॉर्स मध्ये तिच्या सर्जरीबद्दल सर्व काही सांगितले आहे. लेखीकाने लिहिले आहे कि लंडनमध्ये प्रियांकाने आपल्या नाकाची सर्जरी करून घेतली होती. त्यानंतर तिला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ ए स्पाई मध्ये प्रियांकाने अभिनेता सनी देओल सोबत काम केले होते. पण या चित्रपटाच्या अगोदर तिच्या नाकामुळे तिला तब्बल सात चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले होते.
प्रियांकाच्या सर्जरीमुळे तिला तिच्या डेब्यू चित्रपटामधून देखील काढून टाकण्यात आले होते. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत बॉबी देओलला कास्ट केले गेले होते. विजय गलानीचा हा चित्रपट होता. हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. महेशने याआधी अनेक फ्लॉप चित्रपट बनवले होते. ज्यामुळे मार्केटमधील त्यांची व्हॅल्यू खूपच कमी झाली होती. तर बॉबीलासुद्धा प्रियांकाच्या बदललेल्या लुकसोबत काम करण्याची इच्छा नव्हती. ज्यामुळे हा चित्रपट बदलून डिब्बा बंद करण्यात आला. पण महेशने प्रियांकाचे कौतुक करताना तिला एक पॉवरफुल अभिनेत्री म्हणून सांगितले.
प्रियांकासोबत बॉबीदेओलने काम करण्यास नकार दिला होता. पण नंतर प्रियांकाला बॉबीचा मोठा भाऊ सनी देओलसोबत डेब्यू चित्रपट करण्याची संधी मिळाली. पण द हीरो: लव स्टोरी ऑफ ए स्पाई च्या दिग्दर्शकानेसुद्धा प्रियांका सर्जरीबद्दल एक किस्स्याचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये करताना सांगितले आहे कि प्रियांकाला नेहमीच हॉलीवुड अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्ससारखे ओठ असावेत अशी इच्छा होती. तिची इच्छा होती कि तिचे ओठ नेहमी पाउट लिप्स असावेत. प्रियांकाच्या सर्जरीमुळे तिला अनेक चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आले. ज्यानंतर प्रियांकाची आई मधु चोपडाला असे वाटू लागले होते कि आता तिला पुन्हा बरेलीला परत जावे लागेल.