प्रियांका चोप्रा नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये असते. अभिनेत्री आई बनल्यानंतर आता संपूर्ण वेळ तिच्या मुलीसाठी देत आहे. प्रियांका चोप्रा सेरोगेसीद्वारे आई बनली आहे. प्रियांकाचे संपूर्ण जगामध्ये चाहते आहेत. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कि अभिनेत्रीला एकदा चक्क मुलीने प्रपोज केले होते.

अभिनेत्री आपल्या बेधडक वक्तव्यामुळे आणि जबरदस्त लुकमुळे नेहमी चर्चेमध्ये असते. देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा आता ग्लोबल गर्ल बनली आहे. मुद्दा कोणताही असो प्रियांका चोप्रा आपले परखड मत व्यक्त करत असते. अनेक प्रसंगी प्रियांकाने हे सिद्ध केले आहे कि मुद्दा कोणताही असो ती आपले मत व्यक्त करण्यास कधीच मागे हटत नाही. असे एका मुलाखतीदरम्यान झाले होते जेव्हा तिला लेस्बियन मुलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर तिने आपल्या अंदाजामध्ये दिले होते.

प्रश्नांचे उत्तर देताना प्रियांकाने सांगितले होते कि एका मुलीने तिला प्रपोजल दिले होते. तथापि त्यावेळी प्रियांकाने त्या मुलीपासून वाचण्यासाठी अशीच काहीतरी स्टोरी करून सांगितली होती. प्रियांकाने त्या मुलीला सांगितले कि ती रिलेशनशिपमध्ये आहे आणि तिचा एक बॉयफ्रेंड आहे.

प्रियांका चोप्राने हे सर्व करण जौहरच्या शोमध्ये सांगितले. ती म्हणाली कि हि घटना एका नाईट क्लबमध्ये घडली होती. प्रियांकानुसार ज्या मुलीने तिच्यासमोर प्रपोजल ठेवले होते तिला माहित नव्हते कि अभिनेत्री अशाप्रकारची मुलगी नाहीय आणि त्यावेळी प्रियांकाला देखील समजत नव्हते कि तिला नकार कसा द्यावा. प्रियांका तिला ओळखत देखील नव्हती.

प्रियांका चोप्रा तो क्षण आठवून हसली आणि म्हणाली कि शेवटी मी कसेतरी त्या मुलीला नकार दिला. ती म्हणाली कि मी तिला सांगितले कि मी बिलकुल देखील तशी नाही. माझा बॉयफ्रेंड आहे. तथापि त्यावेळी माझा बॉयफ्रेंड नव्हता. पण मी फक्त मुलांनाच पसंद करत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अमेझॉन स्टुडिओ’च्या आगामी ‘शीला’ चित्रपटात ‘मां आनंद शीला’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रियांकाचा हा चित्रपट बॅरी लेव्हिन्सन दिग्दर्शित करणार आहे. प्रियांका ‘शीला’ चित्रपटात अभिनयासोबतच या चित्रपटाच्या निर्मितीचे देखील काम करत आहे.