अज्ञात होऊन रिक्षामध्ये प्रवास करतो हा अभिनेता, पहिला चित्रपट झाला होता सुपरहिट !

2 Min Read

बॉलीवूड अभिनेता प्रियांशु चटर्जीला तर आपण सर्वजण ओळखत असाल. त्याने १९ वर्षांपूर्वी तुम बिन चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या तुम बिन चित्रपटामधून प्रियांशु चटर्जी रातोरात स्टार झाला होता. वृत्तपत्रांच्या हेडिंगमध्ये प्रियांशुच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक किस्से छापून येत असत, पण यानंतर त्याला इतर कोणत्याही मोठ्या चित्रपटामध्ये पाहीले गेले नाही. चित्रपटाचे डायलॉग आणि स्टोरी तरुणांच्या ओठांवर असायचे.प्रियांशुने बॉलीवूडशिवाय बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आपला पहिला चित्रपट तुम बिन चित्रपटामधून त्याने आपली रोमँटिक अभिनेत्याची इमेज बनवली होती आणि त्यानंतर तो सर्वांच्या मनामध्ये चांगला बसला होता. या चित्रपटाशिवाय त्याने ऐश्वर्या रायसोबत दिल का रिश्ता चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. दोन्ही चित्रपटांशिवाय त्याने जूली, कोई मेरे दिल में है, भूतनाथ, चिंटू जी सारखे अनेक इतर उत्कृष्ठ चित्रपट केले.याचबरोबर नुकतेच तो विधू विनोद चोप्राच्या शिकारामध्ये देखील पाहायला मिळाला होता. जवळ जवळ २० वर्षांपासून प्रियांशु बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित राहिला पण अजूनही तो लोकप्रिय नाही झाला. आता प्रियांशु खूपच कमी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत असतो आणि काही दिवसांपूर्वी त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि जर चित्रपट चांगले मिळाले नाहीत तर मी चित्रपट साईन करणार नाही.जर मी काहीही साईन केले असते तर अभिनय सोडून साबण-तेलाचे दुकान उघडून विकत राहिलो असतो. यामुळे मला जेव्हा माझ्या मनासारखे काम मिळते तेव्हाच मी काम करतो. तसे तर इतके सर्व होऊन देखील प्रियांशु रिक्षामध्ये प्रवास करत असतो. आज तो एक सामान्य जीवन व्यतीत करत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *