या मुळे मॉल मधील सार्वजनिक हॅन्ड ड्रायरचा वापर करु नये !

2 Min Read

सार्वजनिक हॅन्ड ड्रायर – प्रत्येक वयाच्या व्यक्तीला जेवणा अगोदार हात धुण्याचा सल्ला दिला जातो हा सल्ला मुलभूत आहे, सगळयांनी त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञांचे देखील मत आहे की, 80 टक्के जंतू हाताच्या माध्यमातून पसरतात, परंतू हात धुतल्यानंतर त्यांना वाळवणे देखील आवश्यक आहे. घरी तर आपण सर्वच हात धुतल्यानंतर एकाच टॉवेलचा वापर करतो, परंतु ऑफीस, हॉटेल किंवा एखाद्या मोठया मॉल मध्ये आपण हाथ वाळविण्यासाठी सार्वजनिक हॅन्ड ड्रायरचा वापर करतो. हात वाळविण्याची ही पध्दत खूप स्वच्छ आहे असे आपल्याला वाटते, परंतु असे नाही. सार्वजनिक हॅन्ड ड्रायरमधून गरम हवा बाहेर येते आणि त्यामुळे जिवाणु आणि रोग पसरतो. हात धुतल्यानंतर सुध्दा थोडे फार बॅक्टेरियाचे कण हातावर राहतात. टिश्यु पेपरने हात पुसल्यानंतर काही किटाणु टिशु पेपरला लागतात. परंतु सार्वजनिक हॅन्ड ड्रायरद्वारे किटाणु पसरतात आणि सार्वजनिक हॅन्ड ड्रायरलादेखील चिकटतात.आपण वापर केल्यानंतर जर इतर व्यक्तीने सार्वजनिक हॅन्ड ड्रायरचा वापर केला तर आपले किटाणु त्याच्या हातावर जातात. संशोधनकर्त्यांचा निष्कर्ष आहे की, सार्वजनिक हॅन्ड ड्रायरच्या जवळील हवेमध्ये बॅक्टेरियाची संख्या नियमित हवेच्या क्षमतेत 45 टक्के जास्त असते तर टिश्यु पेपरच्या आजुबाजुला 27 टक्के जास्त. हात धुतल्यानंतर त्यांना वाळविण्यासाठी नेहमी हातरुमाल किंवा टॉवेलचा वापर करा आणि हात धुण्यासाठी साबणाऐवजी लिक्विड हँडवॉशचा वापर करा. याव्यतिरिक्त हँड सॅनिटायझरदेखील चांगले असतात. त्यामुळे हातावरील घाण आणि दुर्गंधीपासून मुक्ती मिळते परंतु ते किटाणुंना मारण्यासाठी सक्षम असते. सर्वसाधारण साबणाऐवजी जिवाणूरोधक साबणांचा वापर करा. परंतु जिवाणूरोधक साबणाचा अवलंब केल्यानंतर काही काळच आपले हात सुरक्षित राहू शकतात ही गोष्ट अभ्यासातुन पुढे आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *