या पाच कारणांमुळे प्रत्येक भारतीयासाठी देशी तूप खाणे महत्वाचे आहे, जाणून घ्या या मागची कारणे !

3 Min Read

भारतामध्ये प्रत्येक घरात जे जेवण बनवले जाते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुपाचा वापर केला जातो. ते तूप म्हणजे तूप नसून तर आईचे प्रेम असते. परंतु अनेक लोक असा विचार करतात की तुपामुळे शरीरातील चरबी म्हणजेच फॅट वाढते. मात्र ते 100% चुकीचा विचार करतात कारण घरी बनवलेले तूप शरीराला कोणतेही नुकसान पोहोचवत नाही. खूप सारी पोषकतत्व असणारे तूप भारतातील लोक आवडीने खातात. आजच्या जमान्यातील मुला मुली तुपापेक्षा लोणी जास्त प्रमाणात खातात. या पुढील 5 कारणांमुळे प्रत्येक भारतीयाने तूप खाणे का गरजेचे आहे हे कळेल.
पाश्चिमात्य खाद्यपदार्थ आजकाल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खातात या खाद्यपदार्थांमध्ये तूपाला विशेष असे महत्त्व दिले जात नाही. मात्र भारतीय खाद्यपदार्थांमध्ये, जेवणात तुपाला खूप महत्त्व दिले जाते. खरंतर भारतीय लोकांमध्ये देशी तूप न खाण्यामुळे अनेक शारीरिक समस्या वाढू लागल्या आहेत. देशी तूप शरीराला स्वस्थ ठेवण्याचे कार्य करते. चला पाहू तूप खाणे भारतीयांना का गरजेचे आहे.

बटर पेक्षा हेल्दी असते तूप
देशी तूप हे सर्वात चांगला हेल्दी पदार्थ आहे असे नॅशनल सेंटर फोर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन यांनी 2016 साली छापले होते. या अभ्यासात असे म्हटले गेले होते की, बटर पेक्षा देशी तुपात विटामिन एंटीऑक्सीडेंट ओमेगा थ्री ॲसिड आणि एज्युकेटेड आईनोलेइक ॲसिड जास्त प्रमाणात असतात जे मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात.

https://www.hindustantimes.com

जड खाण्यास तूप पचविते
भारतीय खाद्यसंस्कृतीत खाल्ले जाणारे पदार्थ हे पचण्यासाठी जड असतात. आपल्याकडे सामान्यता गव्हाच्या पिठापासून तयार केलेली चपाती खाल्ली जाते. तसेच भातही मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. व्यतिरिक्त भारतीय जेवणात तेल मसाले यांचा वापरही मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे पदार्थ पचवण्यास जड असतात. अशावेळी जेवणात देशी तुपाचा वापर केल्यास हे पदार्थ पचविणे सोपे जाते. देशी तूप पचन तंत्राला स्वस्थ ठेवते आणि बोटांच्या समस्येला  ही दूर ठेवते.

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यास फायदेशीर असते तूप
भारतीय महिलांमध्ये रक्ताची कमी फार लवकर आढळते. 90% महिलांमध्ये आणि 65% हून जास्त पुरुषांमध्ये रक्ताची कमी आढळते. देशी तुपात कोपर आणि लोह मोठ्या प्रमाणात असल्याने तुपाचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे रक्ताची कमी ही नाहीशी होते तसेच शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

https://thumbs.dreamstime.com

डोळ्यांच्या दृष्टीसाठी तूप असते रामबाण
भारतामध्ये 55 ते 60 या वयानंतर मोतीबिंदू होणे एक सर्वसामान्य समस्या आहे म्हणजेच त्या वयापर्यंत लोकांची नजर कमजोर होते देशी तुपात विटामिन ई, विटामिन डी, विटामिन ए ए आणि विटामिन के आढळते. याशिवाय यामध्ये कॅरोटेनोईड नावाचे तत्त्वही ही असते. जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्याकरिता मदत करते जुने लोक जे लहानपणी शुद्ध देशी तू खायचे त्यांची दृष्टी ही सदैव चांगली असायची.

हाडांमधील कमजोरी तूप दूर करते
आजकाल भारतीय लोकांमध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी कमी झाल्याने हाडे लवकर कमजोर होत आहेत ज्या कारणाने फ्रॅक्चर होणे, ऑस्टियोपोरोसिस, अर्थराइटिस अशा समस्या वाढत आहेत. एक एक चमचा तुपात 115 कॅलरीज असतात तर त्यामध्ये 14.9 ग्रॅम हेल्दी फॅट असते. याशिवाय तुपात कॅल्शियम ही ही खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे हाडे मजबूत बनतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *