बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ७ सप्टेंबर १९८५ मध्ये तिचा तामिळनाडू येथे जन्म झाला होता. अभिनेत्री राधिका आपटेने मराठीसोबत तमिळ, तेलगु, बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

राधिकाने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात थिएटरपासून केली होती. तिने २००५ मध्ये वाह लाईफ हो तो ऐसी या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि संजय दत्त देखील मुख्य भूमिकेमध्ये होते. राधिकाचा मुख्य अभिनेत्री म्हणून २००९ मध्ये रिलीज झालेला आनंद चित्रपट हा बंगाली चित्रपट होता.

२०१५ मध्ये आलेल्या बदलापूर आणि मांझी – द माउंटनमॅन या चित्रपटांमुळे तिला खरी ओळख मिळाली. २०१६ मध्ये ती फोबिया आणि पार्च्ड चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये दिसली होती. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपटांसोबत तिने वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे. लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स, गुल अशा वेब सिरीजमध्ये ती काम करताना दिसली आहे.

काही वर्षांपूर्वी राधिका आपटे एका न्यू ड सीनमुळे खूप चर्चेमध्ये आली होती. त्यावेळी राधिकाला खूप टीकेचा देखील सामना करावा लागला होता. मुलाखतीदरम्यान तिच्यावर वाईट परिणाम झाल्याचे देखील तिने सांगितले होते. राधिका म्हणाली होती कि क्लीन शेव्ह’च्या शूटिंगदरम्यान जेव्हा न्यू ड क्लिप लिक झाली होती तेव्हा मला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागले होते.

मी त्यावेळी चार दिवस घरामधून बाहेर पडले नव्हते. माझा ड्रायव्हर, वॉचमन आणि माझ्या स्टायलिस्टच्या ड्रायव्हरने माझे फोटो ओळखले होते. त्यामुळे मी जेव्हा पार्च्ड चित्रपटामधील सीनसाठी कपडे उतरवले तेव्हा मला असे वाटले होते कि आता माझ्याकडे लपवण्यासाठी काहीच नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

राधिका आपटे जास्त करून पार्ट्यांमध्ये पाहायला मिळत नाही. राधिका बहुतेकवेळा तेव्हा चर्चेमध्ये येते जेव्हा तिचा एखादा चित्रपट रिलीज होणार असतो. राधिका लवकरच आता विक्रम वेधा आणि मोनिका ओ माय डार्लिंग चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही चित्रपटांमधील तिचा लुक समोर आला आहे.