बॉलीवूडमध्ये नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार देखील आले ज्यांनी खूपच कमी काळामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक जागा निर्माण केली. काही कलाकार तर जितक्या वेगाने सफल झाले तितक्या वेगाने त्यांच्या सफलतेचा ग्राफ खाली पडला.

आज आपण ९० च्या दशकामधील एका अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी देखील खूपच कमी काळामध्ये लोकप्रिय झाली होती. या अभिनेत्रीचे नाव आहे रागेश्वरी लूंबा. जिच्या आवाजाचे लाखो चाहते होते. ती गाणे गण्यासोबतच अभिनय देखील करत होती.

रागेश्वरीच्या अल्बमने तिला रातोरात स्टार बनवले होते. पण तिची सफलता फार काळ टिकली नाही. तिच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या ज्यामुळे तिला मोठ्या पडद्यापासून दूर जावे लागले. रागेश्वरीच्या करियरची सुरुवात खूपच कमी वयामध्ये झाली होती. कमी वयामध्ये तिने मॉडलिंग करायला सुरुवात केली होती.

जसे जसे तिचे वय वाढत गेले तसे तसे ती शोबिजचा चेहरा बनली. रागेश्वरीने आखे चित्रपटामधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. याशिवाय रागेश्वरीने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. अक्षय कुमारचा सुपरहिट चित्रपट मैं खिलाड़ी तू अनाड़ी चित्रपटामध्ये तिने अक्षय कुमारची बहिण आणि सैफची हिरोईन म्हणून काम केले होते.

रागेश्वरी एक अशी कलाकार होती जी अभिनयासोबत सिंगिंगमध्ये देखील करियर करत होती. त्यावेळी तिने अनेक गाण्यांना आपला आवाज दिला होता. ९० च्या दशकामध्ये ती खूपच सफल झाली होती. पण तिच्या जीवनामध्ये असे वादळ आले ज्यामुळे तिला आपले काम सोडावे लागले.

रागेश्वरी जेव्हा तिच्या करियरच्या शिखरावर होती तेव्हा तिला अचानक पॅरालिसिसचा झटका आला होता आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरच्या मांसपेशी कमजोर पडल्या होत्या. हे सर्व इतक्या अचानक झाले कि तिला काही समजलेच नाही कि यामागचे कारण काय आहे.

डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये सांगितले गेले कि तिचा चेहरा आणि चेस्टचा अर्धा हिस्सा सुन्न पडला आहे. त्यावेळी ती इतकी आजारी होती कि तिला बोलता देखील येत नव्हते. तथापि तिने स्वतःला ठीक करण्यासाठी योगा, थेरेपी आणि मेडिटेशन केले ज्यामुळे ती लवकरच ठीक झाली पण तिला यामुळे तिचे करियर सोडावे लागले.