ऐश्वर्यामुळे जेव्हा रजनीकांतवर आली होती नामुष्की, शेजारीने हे म्हणून उडवली होती खिल्ली !

2 Min Read

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या बच्चनने आतापर्यंत अनेक मोठ्या सुपरस्टारसोबत काम करून बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ऐश्वर्या आणि रजनीकांतची जोडी रोबोट चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. तथापि एकदा ऐश्वर्या बच्चनमुळे रजनीकांतवर नामुष्की ओढवली होती. मलेशियामध्ये चित्रपटाच्या ऑडियो लॉन्च वर रजनीकांतने हा किस्सा सांगितला होता.

रजनीकांतने यादरम्यान सांगितले कि एका शेजारीने त्यांचे केस गळण्यामुळे आणि ऐश्वर्यासोबत काम केल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवली होती. रजनीकांतने यावेळी सांगितले होते कि शेजारीच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले कि केस तर सर्व निघून गेले. नंतर शेजारीने विचारले कि चित्रपटामध्ये हीरोइन कोण आहे.रजनीकांतने सांगितले कि ते ऐश्वर्यासोबत काम करत होते. यावर ते त्यांना १० मिनिट एकटक पाहत होते. रजनीकांतने सांगितले कि यानंतर त्यांनी काही लोकांना आपापसात बोलताना ऐकले कि ऐश्वर्या राय, अभिषेक आणि अमिताभला सांगितले गेले होते कि ती त्यांची हिरोईन बनत आहे.

ऐश्वर्या आणि रजनीकांत यांना रोबोट चित्रपटामध्ये पाहिले गेले होते. या चित्रपटामधील त्यांच्या जोडीला खूपच पसंती मिळाली होती. या दोघांच्या जोडीला मोठ्या पडद्यावर खूपच प्रेम मिळाले. रोबोट हा चित्रपट खूपच सुपरहिट झाला होता. ऐश्वर्या राय बच्चन हि सध्या चित्रपटांपासून दूरच आहे. ऐश्वर्या फन्ने खान या चित्रपटामध्ये शेवटची पाहिली गेली होती परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. सध्या ती पोनियान सेलवन या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. मणी रत्नम हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.तर रजनीकांतचा नुकताच दरबार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करू शकला. रजनीकांत हे अन्नाथी या आगामी चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *