भारताचे वॉरेन बफेट म्हणून ओळखले जाणारे शेयर मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिग्गज भारतीय शेयर मार्केट इन्वेस्टर राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. रविवारी सकाळी त्यांच्याबद्दल दुखद बातमी समोर आली. राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

राकेश झुनझुनवाला शेयर मार्केट इन्वेस्टर्समध्ये खूपच लोकप्रिय होते. माहितीनुसार त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि डॉक्टर्स त्यांना वाचवू शकले नाही. त्यांच्या निधनाने कारण मल्टी ऑर्गन फेल्योर सांगितले जात आहे.

ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये डॉक्टर्सची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होते. राकेश झुनझुवाला यांना वाचवण्यासाठी हर संभाव प्रयत्न केले गेले पण डॉक्टरांच्या हाती निराशा लागली. रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. १३ ऑगस्ट रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती.

यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. जिथे डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत होते पण रविवारी सकाळी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. ते अनेक दिवस आपल्या खराब प्रकृतीचा त्रास सहन करत होते. ब्रीच कँडी रुग्णालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाची पुष्टी रविवारी केली होती. असे सांगितले जात होते कि त्यांचे निधन १४ ऑगस्ट सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी झाले आहे. रुग्णालयात त्यांना काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते आणि त्यांना डिस्चार्ज दिला गेला होता. पण शनिवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलाई १९६० रोजी हैदराबादमध्ये झाला होता. पहिला ते चार्टर्ड अकाउंटंट होते आणि नंतर त्यांनी शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता ते शेयर मार्केटमध्ये किंग बनले. राकेश झुनझुनवाला हे आपल्यामागे आपले कुटुंब, चाहते आणि ४० हजार करोडची संपत्ती सोडून गेले.