लॉकडाउन दरम्यान बॉलीवूड ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत सध्या आपल्या सिक्रेट वेडिंगमुळे खूपच चर्चेमध्ये येत आहे. राखीने आपल्या लग्नाचे इनसाइड फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. पण खास गोष्ट हि आहे कि या फोटोंमध्ये सुद्धा राखीने आपल्या पतीचा चेहरा दाखवला नाही. ज्यामुळे तिचे फॅन्स खूप नाराज आहेत.

राखीने आपल्या लग्नाचे अनेक फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये एका फोटोत तिच्या पतीचा हात पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये राखी आणि तिचा पती आपल्या लग्नाची रिंग दाखवत आहेत पण काही वेळानंतर त्यांनी हा फोटो डिलीट केला. तर राखीच्या याच फोटोंमध्ये एक फोटो असासुद्धा आहे ज्यामध्ये तिचा पती रितेशने राखीचा हात हातात घेतला आहे. माहितीसाठी तुम्हाला सांगतो कि याआधीसुद्धा अनेक वेळा राखीने अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते ज्यामध्ये तिच्या भांगात कुंकू आणि हातामध्ये चुडा घातला होता. जर तुम्ही तिचा हा फोटो व्यवस्थित पाहिला तर आपल्याला तिच्या चुड्यावर कोणाचेतर नाव सुद्धा पाहायला मिळेल. याआधी राखीने मिडियाच्या समोर कमालसोबत लग्नाची बातचीत केली होती, पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. तर आपल्या स्वयंवरमध्ये तिने आधीच लग्न केले आहे, पण ते लग्न जास्त दिवस टिकू शकले नाही. राखीने फोटोंची सिरीज करताना कोर्ट मॅरेज, ख्रिश्चन वेडिंग आणि हिंदू वेडिंग सोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. राखी सावंतने २८ जुलै २०१९ मध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या लग्नाची घोषणा केली होती. नंतर तिने एका मुलाखती दरम्यान आपला पती एनआरआय असल्याचे सांगितले होते ज्याचे नाव रितेश आहे. लग्नाच्या काही दिवसांपासून राखी कधी हनिमूनचे फोटो तर कधी सिंदूर लावलेले फोटो शेयर करत आहे. पण तिने अजूनपर्यंत आपल्या पतीचा एकसुद्धा फोटो शेयर केलेला नाही कारण लोक त्यावरसुद्धा विश्वास ठेवणार नाहीत.