बॉलीवूड फिल्मी जगतामधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आणि डांसर राखी सावंत सध्या आपल्या वक्तव्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. लग्न आणि प्रेग्नंसीच्या बातम्यांदरम्यान आता राखीने पहिल्यांदाच आपला पती रितेशच्या जॉबबद्दल खुलासा केला आहे.एका नवीन मुलाखतीदरम्यान राखीने पतीबद्दल अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत. राखीला जेव्हा विचारण्यात आले कि ती आपल्या पतीसोबत युकेला शिफ्ट होण्याची प्लानिंग करत आहे का? तेव्हा राखीने यावर उत्तर देताना सांगितले कि आत्ताच नाही. त्यांची इच्छा आहे कि मी इंडस्ट्रीमध्ये राहूनच काम करावे. राखीने म्हंटले कि रितेशने मला विचारले कि, तू चित्रपटांमध्ये काम का करत नाहीस? यावर मी फक्त इतकेच उत्तर दिले कि ओके, राखीने सांगितले कि माझे पती डोनाल्ड ट्रंपच्या कंपनीमध्ये काम करतात.राखीला जेव्हा विचारण्यात आले कि तिच्या पतीला बॉलीवूड पसंत आहे का? यावर उत्तर देताना राखी म्हणाली कि माझे पती माझे फॅन आहेत. आम्ही व्हॉट्सअॅापवर चॅट करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी मला व्हॉट्सअॅतपवरच प्रपोज केले होते. तुम्ही म्हणू शकता कि हे व्हॉट्सअॅतपवर लव्ह मॅरेज आहे. रितेशचे पॅरेंट्स आणि बहिणी खूप चांगल्या आहेत. माझे पती माझ्यासाठी परमेश्वर आहेत. काही काळापूर्वी राखी सावंत म्हणाली होती कि ती २०२० मध्ये बाळाचे प्लानिंग करत आहे. राखीने म्हंटले होते कि मी २०२० मध्ये बेबी प्लानिंग करत आहे.नुकतेच राखी सावंतचा व्हाइट ब्राइडल गाउन, लाल बांगड्या आणि हातामध्ये मेहेंदी लावलेला एक फोटो समोर आला होता. बातमीनुसार राखी सावंतने मुंबईच्या जेडब्ल्यू मेरीट हॉटेलच्या रूममध्ये रविवार २८ जुलैच्या दुपारी लग्न केले होते. या सिक्रेट वेडिंगमध्ये कपलच्या कुटुंबियांव्यतिरिक्त ४-५ अतिथी सामील झाले होते.पण राखी सावंतने लग्नाच्या बातम्यांवर हे सांगताना लगाम लावला होता कि त्यांनी लग्न केले नाही तर हे एक ब्राईडल फोटोशूट होते, ज्यासाठी तिने वधूचा लुक केला होता. पण इतके सर्व झाल्यानंतर राखीने आपले लग्न खरे असल्याचे सांगितले. आता हि गोष्ट खरी आहे का राखी पाहिल्यासारखे चाहत्यांना धोका देत आहे हे सांगता येत नाही.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.