बॉलीवूड सेलेब्रिटीजचे ट्रोल होणे काही नवीन गोष्ट नाही. अशीच काही घटना अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसोबत घडली आहे. वास्तविक सोशल मिडियावर रकुल प्रीत सिंहचा एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती कार मधून उतरताना दिसत आहे. यादरम्यान तिचा पाहून असे वाटत आहे कि तिने फक्त शर्ट घातला आहे. त्याखाली तिची पँट दिसत नाही आहे.

तिच्या या फोटोवर एका ट्विटर यूजरने कमेंट करून विचारले कि तू पॅंट घालायला विसरली आहेस का? तर एकाने कमेंट करत लिहिले आहे कि पब्लिक प्लेसमध्ये येण्यापूर्वी काय घालायला हवे हे माहिती नाही का ?

कमेंट पाहिल्यानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चांगलीच भडकली आणि म्हणाली कि जे लोक माझ्या एथिक्सवर प्रश्न उपस्थित करत आहेत ते लोक त्यावेळी का बोलत नाहीत ज्यावेळी महिलांचे शोषण होत असते. हि गोष्ट मानसिक रूपाने आजारी लोकांना हि जाणीव करून देण्यासाठी म्हणत आहे कि त्यांचे देखील कुटुंब असते. त्यांना कसे वाटेल जेव्हा त्यांच्यासोबत देखील असे होईल. मला वाटते कि त्यांची आई त्यांना एक थप्पड जरूर मारेल.

रकुल प्रीत सिंहचा पॅंटलेस फोटो ज्यामुळे ती ट्रोल होत होती वास्तविक त्याचे सत्य काही वेगळेच आहे. रकुल प्रीत सिंहने डेनिम शर्टच्या खाली डेनिम शॉर्ट्स देखील घातले होते. तिचा फक्त एकाच अँगलचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. जेव्हा त्याचे संपूर्ण सत्य समोर आले तेव्हा ट्रोल करणाऱ्या युजर्सनी आपले ट्वीट डिलीट केले.