जेव्हापासून दूरदर्शनवर रामायणचे री-टेलीकास्ट सूर झाले आहे तेव्हापासून या धार्मिक सिरीयलने टीव्ही पासून ते सोशल मिडीयावर सर्वत्र वर्चस्व गाजवले आहे. प्रत्येकजण रामायण संबंधित किस्से आणि कलाकारांबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे. नुकतेच रामायण मधील लक्ष्मण म्हणजेच सुनील लहरीचा मुलगा कृश पाठकबद्दल खूपच चर्चा होऊ लागली आहे. कृश आपल्या वडिलांसारखाच अभिनयासाठी वेडा आहे. त्याने चित्रपटांमध्ये पदार्पण देखील केले आहे पण एक अभिनेता म्हणून नाही… नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने स्वतःबद्दल अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून सुनील लहरी यांच्याबद्दल अनेक रंजक गोष्टी समोर येत आहेत. यादरम्यान आता त्यांचा मुलगा कृशने एका वृत्तवाहिनिशी बातचीत केली आहे आणि यामध्ये समोर आले आहे कि त्याला सुद्धा त्याच्या वडिलांसारखे अभिनयामध्ये यशस्वी व्हायचे आहे. कृश पाठकने २०१६ मध्ये टीव्ही शो P.O.W- बंदी युद्ध के मधून अभिनयामध्ये पदार्पण केले होते. या शोमध्ये तो आर्यन खानच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. तथापि त्याचे म्हणणे आहे कि त्याला टीव्हीवर करियर बनवायची जरासुद्धा इच्छा नाही, तर त्याला चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवायची आहे.कृश म्हणतो कि त्याने आपल्या अभिनय करियरमध्ये वडिलांची मदत घेतलेली नाही पण तो वडिलांनी दिलेली एक शिकवण नेहमी लक्षात ठेवतो. कृशने मुलाखतीमध्ये सांगितले कि वडील सांगतात कि स्वतःच्या जोरावर पुढे जावा आणि मेहनत करा. सुनील लहरी यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाउस देखील आहे. कृश, करण जौहर, अनुराग कश्यप आणि निखील आडवाणी यांना आपला फेवरेट फिल्म मेकर मानतो. याशिवाय त्याने सांगितले कि तो सध्या एका म्युजिक व्हिडीओवर काम करत आहे जो लॉकडाउननंतर रिलीज होणार आहे.कृश पुढे म्हणाला कि चित्रपटांमध्ये निगेटिव आणि ग्रेशेड रोल करण्याची त्याची इच्छा आहे. याशिवाय कृश म्हणतो कि जर त्याला बिग बॉसमध्ये जाण्याची संधी मिळाली तर तो जरूर जाईल. याचे मुख्य कारण हे आहे कि तो सलमान खानचा खूप मोठा फॅन आहे. याचबरोबर त्याने आपल्या वेटलॉस जर्नी बद्दल देखील सांगितले. कृश म्हणतो, काही वर्षापूर्वी माझे वजन १०५ किलो होते. मी माझ्या मामाच्या इथे युएसला गेलो तिथे ट्रेनिंग घेतली आणि नंतर पाच महिन्यामध्ये ७० किली वजन कमी केले.