कोरोनाच्या महामारीमुळे देशात सध्या लॉक-डाउन सुरु आहे आणि यामुळे लोकांच्या मागणीवरून ३३ वर्षांपूर्वी दूरदर्शन राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित केली जाणारी लोकप्रिय मालिका रामायण याचे पुन्हा प्रसारण सुरु करण्यात आले. या मालिकेचे प्रसारण सुरु झाल्यानंतर लोकांमध्ये एक खास उत्साह पाहायला मिळाला. अल्पावधीतच या मालिकेने २०१५ पासूनचे टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. प्रत्येक दिवशी सोशल मिडियावर या मालिकेचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
८० च्या दशकामध्ये रामायणची जी क्रेज होती ती दर्शनाकांमध्ये आजसुद्धा पाहायला मिळत आहे. रामायण मालिकेचे प्रसारण पुन्हा डीडी नॅशनलवर सुरु करण्यात आले आहे. या शोचे प्रसारण सकाळी आणि रात्री ९ वाजता करण्यात येत आहे. शोमध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविलचे फॅन्स तेव्हासुद्धा होते आणि आजसुद्धा तितकेच आहेत. आज त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमी उत्सुक असतात. यादरम्यान सोशल मिडियावर अरुण गोविल यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.हा फोटो अरुण गोविल यांच्या तरुणपणातील आहे. फोटो कृष्णधवल आहे. हा फोटो अरुण गोविल यांची वहिनी तब्बसुम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेयर केला आहे. हा फोटो शेयर करताना त्यांनी लिहिले आहे कि, प्रकाश जावड़ेकरजी यांचे मी आभारी आहे ज्यांनी रामायण मालिका डीडी नॅशनलवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हा फोटो तुफान व्हायरल झाला असून अल्पावधीतच याला लाखो हिट मिळाले आहेत.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले आहे कि – याचा सर्वात मोठा फायदा हा होईल कि आजच्या पिढीला माहिती होईल रामायण काय आहे. माझे भाग्य आहे कि राम म्हणजेच अरुण गोविल माझे भावजी आहेत. अरुण गोविल यांचा हा फोटो खूपच पसंत केला जात आहे. या फोटोमध्ये अरुण गोविल यांना ओळखणे देखील खूपच कठीण आहे.
रामायण मध्ये साकारल्या गेलेल्या रामाच्या भूमिकेमुळे अरुण गोविल यांना पूर्ण देशामध्ये प्रसिद्धी आणि सन्मान तर खूपच मिळाला शिवाय हि भूमिका दर्शकांच्या मनामध्ये इथपर्यंत बसली कि अरुण गोविल यांना लोक रामाच्या भूमिकेतच पाहू लागले. त्यांचाकडे कोणत्याही इतर भूमिकेसाठी कोणताही दिग्दर्शक आला नाही. ज्यामुळे ते आपल्या करियरमध्ये चागल्यारीतीने पुढे जाऊ शकले नाहीत.