रामानंद सागरची रामायण हि सिरीयल जेव्हापासून टीव्हीवर पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे तेव्हापासून शोचे सर्व स्टार्स पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत. या सिरीयलला आजसुद्धा तितकेच प्रेम मिळत आहेत जितके त्याकाळामध्ये मिळत होते. रेटिंग बाबतीत या सिरियलने सर्व शोजला मागे टाकून नंबर १ चा शो बनला आहे. या सिरीयलमुळे अरुण गोविल आणि दीपिका चीखलीया या दोन कलाकारांना देवाची पदवी मिळाली होती. हे दोघे जिथे जायचे तेथील लोक त्यांना भगवान राम आणि माता सीता मानत होते.तर आता जेव्हा रामायण सिरीयल पुन्हा प्रसारण होत आहे तेव्हा फॅन्स या सिरीयल मधील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. आज आम्ही तुम्हाला माता सीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चीखलीयाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. दीपिकाने रामायणच्या लोकप्रियतेनंतर १९९१ मध्ये गुजराती बिजनेसमॅन हेमंत टोपीवाला सोबत लग्न केले होते. दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये स्वत राजेश खन्नाने उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी दीपिका इतकी लोकप्रिय होती कि ती जेव्हा कुठेही जात होती तेव्हा लोक तिचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करत असत.
माहितीसाठी सांगतो कि दीपिका चीखलीयाच्या पतीची एक कॉस्मेटिक कंपनी आहे. लग्नानंतर दीपिका चंदेरी दुनियेपासून दूर राहू लागली होती. सध्या दीपिका आपल्या पतीच्या कंपनीमध्ये रिसर्च आणि मार्केटिंग टीमचा कार्यभार सांभाळते. हि कंपनी शृंगार बिंदी आणि नेलपॉलिशचे मोठ्या प्रमाणात निर्माण करते. दीपिका चीखलीया आणि हेमंत टोपीवाला यांना दोन मुली आहेत. नुकतेच अभिनेती दीपिका चीखलीया आयुष्मान खुरानाच्या बाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. बाला चित्रपटामध्ये तिने यामी गौतमच्या आईची भूमिका साकारली होती. दीपिका सीताच्या भूमिकेमध्ये आपल्या पेहरावावरदेखील नेहमी विशेष लक्ष देत असते.