बाहुबली चित्रपटामधून लोकप्रिय झालेली राम्या कृष्णन जवळ जवळ २४ वर्षानंतर हिंदी चित्रपटामध्ये परतली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या लायगर चित्रपटामध्ये ती विजय देवरकोंडाची आई बालामणिच्या भूमिकेत दिसली होती. ५१ वर्षाची राम्या आज भलेही आईच्या भूमिकेत दिसते पण एक काळ असा होता जेव्हा ती बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. तिने मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन, अनिल कपूर, गोविंदा आणि शाहरुख़ खान सारख्या स्टार्ससोबत रोमांस केला आहे.

राम्या कृष्णनने बॉलीवूड करियरची सुरुवात १९८८ मध्ये दयावान चित्रपटामधून केली होती, ज्यामध्ये विनोद खन्ना, फिरोज खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेमध्ये होते. राम्या या चित्रपटामध्ये हैया ओ हैया’ या आयटम साँगवर डांस करताना दिसली होती. १९९३ मध्ये राम्या संजय दत्तच्या खलनायक चित्रपटामध्ये दिसली होती. तिने संजय दत्तच्या मिस्ट्रेसची भूमिका केली होती.
त्यानंतर १९९३ मध्ये ती परंपरा चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिने पृथ्वीची भूमिका करणाऱ्या विनोद खन्नाच्या गर्लफ्रेंड ताराची भूमिका केली होती. चित्रपटामध्ये सुनील दत्त, आमिर खान, रवीना टंडन, अनुपम खेर आणि अश्विनी भावे देखील मुख्य भूमिकेमध्ये होते. त्यानंतर ती १९९४ मध्ये आलेल्या क्रिमिनल चित्रपटामध्ये दिसली होती ज्यामध्ये तिने नागार्जुनच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होती. मनीषा कोईराला देखील या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होती.
१९९६ मध्ये राम्याने पहिल्यांदाच शाहरुख़ खानसोबत स्क्रीन शेयर केली होती. चाहत चित्रपटामध्ये तिने नसीरुद्दीन शाहची मुलगी रेशमा नारंगची भूमिका केली होती. चित्रपटामध्ये पूजा भट्ट आणि अनुपम खेरने महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.

१९९७ मध्ये राम्या कृष्णनचे तीन चित्रपट आले होते. तिने बनारसी बाबूमध्ये गोविंदाच्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होती तर मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ अभिनित शपथ चित्रपटामध्ये तिने इंस्पेक्टर कविताची भूमिका केली होती. धर्मेन्द्र, मिथुन चक्रवर्ती, मोहन जोशी आणि शक्ति कपूर अभिनित लोहा चित्रपटामध्ये तिने स्पेशल अपीयरेंस दिला होता आणि तिच्या भूमिकेचे नाव करिश्मा होते.

१९९८ मध्ये आलेल्या नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित अभिनित वजूद चित्रपटामध्ये राम्या कृष्णनने ट्रिपल रोल केला होता. ती शालिनी, सोफिया आणि अमीनाच्या भूमिकेमध्ये दिसली होती. १९९८ मध्ये राम्या कृष्णन अमिताभ बच्चन आणि गोविंदा अभिनीत बड़े मियां छोटे मियां चित्रपटामध्ये देखील दिसली होती. तिने अमिताभ बच्चनची गर्लफ्रेंड नेहा आहूजाची भूमिका केली होती.