राजमौली यांच्या बाहुबली या चित्रपटाने फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढून एक नवीन रेकॉर्ड केला होता. बाहुबली चित्रपटामधून प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा दग्गुबती, तमन्ना या सर्वच कलाकारांना खूपच लोकप्रियता मिळाली होती. बाहुबलीमध्ये भल्लालदेवाची भूमिका करणारा प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबतीच्या फॅन्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राणाने सोशल मीडियावर आपली गर्लफ्रेंड व जोडीदार मिहिका बजाजबरोबरच्या नात्याची पुष्टी केली आहे. ही माहिती स्वतः राणा दग्गुबतीने ट्वीट करून दिली आहे.राणा दग्गुबतीने मिहिका सोबत फोटो शेअर करताना असे लिहिले आहे की, तिने होकार दिला आहे. या गोष्टीचा पुरावा म्हणून त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यानिमित्ताने श्रुति हसन, श्रिया पिळगावकर, तमन्ना, कृती खरबंदा इत्यादीं सेलेब्रिटींनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल कपूरने सुद्धा लिहिले आहे कि- ‘अभिनंदन, माझ्या हैदराबादी मुला. हे तुमच्या दोघांसाठी खूप चांगले झाले आहे.मिहिका बजाज एका इवेंट मॅनेजमेंट कंपनी ड्यू ड्रॉप्स डिझाईन स्टूडियोची संस्थापक आहे. ती इंस्टाग्रामवर आपल्या प्रोफेशनल लाईफ संबंधी नेहमी फोटो शेअर करत असते. तर राणा दग्गुबती हा साउथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने हिंदी चित्रपट दम मारो दम, डिपार्टमेंट, ये जवानी है दीवानी, बेबी, द गाजी अटॅक आणि हाउसफुल ४ मध्ये काम केले आहे.
तसे पाहिले तर साउथ मध्ये त्याची पॉपुलॅरिटी आधीपासूनच आहे. पण बाहुबली नंतर तो हिंदी दर्शकांमध्ये देखील लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटातील त्याच्या निगेटीव कॅरेक्टरचे दर्शकांनी खूपच कौतुक केले होते. राणा दग्गुबतीचा आगामी चित्रपट हाथी मेरे साथी आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगु आणि तमिळ भाषेमध्ये बनवला जाणार आहे. हा चित्रपट २ एप्रिलला प्रदर्शित होणार होता परंतु कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.