सध्या बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये रणबीर कपूर आणि आलीय भट्ट यांच्या लव्ह स्टोरीचे चर्चे खूपच होत आहेत. हे दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आलियाला डेट करायच्या अगोदर रणबीर कपूर कॅटरीना कैफला डेट करत होता. पण जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हा काही काळानंतर आलीय रणबीरच्या आयुष्यामध्ये आली. तसे तर त्यांच्या या जोडीला त्यांचे चाहते खूपच पसंत करत आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत होते होते. तर त्यांच्या चाहत्यांची अशी इच्छा होती कि मोठ्या पडद्यावर हे दोघे एकत्र काम करताना पाहायला मिळावेत. त्यांच्या चाहत्यांची हि इच्छा देखील लवकरच पूर्ण होणार आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये हे दोघे एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटामध्ये रणबीर आणि आलिया मुख्य भूमिका साकारणार आहेत. आता त्यांच्याबद्दल हि देखील बातमी समोर येत आहे कि ते लवकरच लग्न देखील करणार आहेत.काही दिवसांपूर्वी मिडियामधून या बातम्या समोर येत होत्या कि ते ब्रह्मास्त्र या चित्रपटाची शुटींग पूर्ण झाल्यानंतर विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. पण आता त्यांच्याबद्दल एक नवीन बातमी समोर आली आहे. ताज्या अहवालानुसार त्यांनी आपल्या लग्नासाठी मुंबई हे ठिकाण निवडले आहे, ते डेस्टिनेशन वेडिंग करणार नाहीत.रणबीर आणि आलिया भट्ट डेस्टिनेशन वेडिंगऐवजी मुंबईमध्ये लग्न करणार आहेत. याचबरोबर एका मिडिया पोर्टलकडून बातमी येत आहे कि ते डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. असे सांगितले जात आहे कि त्यांच्या लग्नाची तारीख देखील फिक्स झाली आहे आणि त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम ४ दिवस चालणार असून तो २१ डिसेंबर पासून सुरु होणार आहे.रणबीर आणि आलियासोबत त्यांचे कुटुंबीय देखील एकमेकांच्या जवळ आले आहेत. रणबीर आणि आलीय एकमेकांसोबत कोणत्याना कोणत्या इवेंटमध्ये नेहमी पाहायला मिळत असतात. त्याचबरोबर नुकतेच ऋषि कपूर यांची तब्येत बिघडली होती तेव्हा आलिया सुद्धा अनेक वेळा त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.
तर आता ऋषि कपूर यांची तब्येत चांगली झाली आहे तेव्हा, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे आपल्या नात्याला पुढच्या पायरीवर पोहोचवण्याच्या तयारीमध्ये लागले आहेत.