बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांचे नाते काही लपून राहिले नाही. दोघेही एकमेकांसोबत घट्ट नात्यात होते. एवढेच नव्हे तर कतरीना आणि रणबीर च्या लग्नाच्या चर्चांनी सुद्धा मध्यंतरी जोर धरला होता. पण अचानक काय झाले कोणास ठाऊक दोघांचा ब्रेक-अप झाला. रणबीर आणि कतरिना चा ब्रेकअप ही सर्वांना हैराण करायला लावणारी गोष्ट होती.‌ आता पुन्हा एकदा या दोघांच्या ब्रेकअप च्या चर्चांनी जोर धरला आहे. कतरिनाने खुप काळानंतर त्यांच्या ब्रेकअप बद्दल खुलासा केला. कतरिनाने सांगितले की तिला नव्याने पुन्हा उभे राहण्यापूर्वी ब्रेकअप करणे गरजेचे होते.मीडिया रिपोर्टनुसार कतरिनाने तिच्या ब्रेकअपबद्दल खुलेपणाने सांगितले. ती म्हणाली की मी पुन्हा एकदा त्यामध्ये गुंतण्या पूर्वी मला ब्रेकअप करावा लागला. जे घडत होते त्या प्रत्येक गोष्टीचा मला अनुभव घ्यावा लागला. या काळात मला माझी संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागली. यापेक्षा मी काय करू शकत होती आणि काय करू शकले असते हे जाणून घेण्या शिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कारण ज्या गोष्टींना मी जबाबदार नाही अशा समस्यांना मी तोंड देत होते.कतरीना ने पुढे सांगितले की ती खूप भावूक आहे. तसेच ती कर्क राशीची असल्याने ती खूप संवेदनशील व्यक्ती आहे. मी कोणाच्या जाण्याने बदलणाऱ्यातली नाही. पण रणबीर च्या जाण्याने मी एक स्त्री म्हणून शिकली की काहीही झालं तरी आपल्याला आपली ओळख नीट ठेवली पाहिजे. आपल्यामध्ये आत्मसन्मान हा आपोआप येतो तो आणण्यासाठी इतर कोणा व्यक्तीची गरज भासत नाही. आपण या जगात एकटेच येतो आणि एकटेच जातो. मी असे अजिबात म्हणणार नाही की प्रेमात कधी पडू नये कारण प्रेमळ नात्यांमध्ये असणे ही एक खूप सुंदर गोष्ट आहे. पण आता मला ठाऊक आहे की आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपल्याला दुसरे कोणीही मदत करणार नाही.नुकताच आलिया भटचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कॉफी विथ करण या शोमधील असून या शोमध्ये आलिया सांगते की तिला रणबीर कपूर सोबत लग्न करण्याची इच्छा आहे. त्यावेळी कतरिना आणि रणवीर एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. आलियाने नेहमीच तिचे रणबीरवर प्रेम असल्याचे कबूल केले आहे. आणि विशेष म्हणजे आलिया आणि रणबीर दोघेही आता रिलेशनमध्ये आहेत. आलियाने हेसुद्धा सांगितले की तिचा एक प्लान आहे याबद्दल कतरिनाला माहित आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर आलिया कपूर परिवारातील एका सदस्याप्रमाणे सगळीकडे दिसून येते. या दोघांमधील नाते स्पष्ट दिसून येते. आलिया आणि रणवीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.