बॉलीवूडमध्ये सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या चर्चा सामान्य आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर हे कपल प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक मुलाखतीमध्ये दोघंही चित्रपटाबद्दल बातचीत केली तर आपल्या नात्याबद्दल देखील सांगितले. यासोबत आता रणबीरने आपल्या पर्सनल लाईफबद्दल एक सिक्रेट शेयर केले आहे.

ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरने अनेक मुलाखती केल्या. ज्यामध्ये त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली. तर एका मुलाखतीमध्ये त्याने आपली पत्नी म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्टच्या स्लीपिंग पोजीशनबद्दल खुलासा केला. रणबीरने म्हंटले कि आलियाची स्लीपिंग पोजीशन खूपच वेगळी आहे. ती रात्रभर संपूर्ण बेडवर गोल गोल चक्कर करते. अशामध्ये मी बेडच्या एका कॉर्नरमध्ये जातो.

रणबीर कपूर पुढे म्हणाला कि किती देखील मोठा बेड असुदे मला कॉर्नरमध्ये जावेच लागते. कारण मला फक्त एक कोपरा मिळतो. आलियाच्या या सवयीसोबत मला रोज स्ट्रगल करावे लागते. रणबीरने आलियाच्या या विचित्र सवयीची पोलखोल सर्वांसमोर केली.

आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे कि आलीय तिचा पती रणबीर कपूरच्या कोणत्या सवयीची पोलखोल करते. नुकतेच रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये रणबीर आणि आलियाने पहिल्यांदाच स्क्रीन शेयर केली आहे. चित्रपटाला खूपच पसंद केले जात आहे.
चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे. चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कमाईबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने आतापर्यंत ४०० करोड रुपये पेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. अजूनहि या चित्रपटाचे कलेक्शन सुरूच आहे.