बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. नुकतेच दोघांनी आलिया भट्टच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. प्रेग्नंसीनंतर दोघे खूपच चर्चेमध्ये राहिले होते. असो आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये राहतात.

सध्या आलिया आणि रणबीरची जोडी खूपच चर्चेमध्ये आहे. वास्तविक त्यांचा ब्रम्हास्त्र चित्रपट सुपरहित झाला आहे. पण हे चर्चेमध्ये राहण्याचे कारण नाही तर काही वेगळेच आहे. अभिनेता रणबीर कपूरने आलिया आणि त्याचे बेडरूम सिक्रेट शेयर केले आहे.

नुकतेच रणबीर कपूरने एका मुलाखतीमध्ये आलिया आणि आपल्या बेडरूमचे अनेक सिक्रेट उघड केले आहेत. रणबीरला विचारले गेले कि आलियाची कोणती गोष्ट सहन करू शकतो. त्यावर बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर म्हणाला कि आलियासोबत झोपणे खूपच अवघड आहे.

ती झोपल्यानंतर बेडवर फिरू लागते. हळू हळू बेडवरचा स्पेस कमी होऊ लागतो आणि मी एका कोपऱ्यामध्ये जातो. आलिया आणि रणबीर अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी गेल्या वर्षी लग्न केले.

लग्नाच्या काही महिन्यानंतरच आलिया प्रेग्नंट राहिली होती. आलियाच्या प्रेग्नंसीची घोषणा केल्यानंतर चाहते हैराण झाले होते. आलिया रणबीरला आपला लहानपणीचा क्रश म्हणून सांगते. लवकरच दोघे आईवडील बनणार आहेत.