९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीने आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. राणी मुखर्जीच्या संस्मरणीय चित्रपटांमध्ये चोरी चोरी चुपके चुपके, बिच्छू, आणि गुलामी सारखे चित्रपट सामील आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एक अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जीने राणी मुखर्जीची पर्सनल असिस्टेंट राहून एक्टिंग शिकली आहे आणि आज ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

आम्ही इथे ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती आहे प्रियांका चोप्राची बहिण परिणीती चोप्रा. अभिनेत्री परिणीती चोप्राने लेडीज वर्सेस रिकी बहल चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे. पण बॉलीवूडमध्ये तिला इशकजादे चित्रपटामधून ओळख मिळाली. परिणीतीचा पहिला चित्रपट भलेहि फ्लॉप राहिला पण फिल्मी जगतामध्ये ती आपली एक जागा निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.परिणीती फिल्मी जगतामधील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. सध्याच्या काळामध्ये परिणीती राणी मुखर्जीपेक्षासुद्धा जास्त महागडी अभिनेत्री बनली आहे. पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी परिणीती राणी मुखर्जीची पर्सनल असिस्टेंट म्हणून काम करत होती. त्याचबरोबर ती तिच्यासोबत राहून एक्टिंगसुद्धा शिकली होती.
परिणीतीने राणी मुखर्जीसोबत राहून एक्टिंग शिकली आहे. चित्रपटांमध्ये येण्याचा सल्ला देखील राणी मुखर्जीनेच दिला होता. आज परिणीती एक्टिंगच्या बाबतीत राणीपेक्षाहि खूप पटीने पुढे आहे. परिणीतीच्या फिल्मी करियरबद्दल बोलायचे झाले तर परिणीती संदीप और पिंकी फरार, द गर्ल ऑन द ट्रेन आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक साइना मध्ये पाहायला मिळणार आहे.