रवीना टंडन यांचे नाव बॉलीवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाच्या नावे एक पेक्षा एक सुपरहिट चित्रपट नोंदवलेले आहेत. ९०च्या दशकात रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. रवीनाने ‘मोहरा’ चित्रपटाच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याने तरुणांच्या अंतःकरणाला आग लावली होती आणि तीच आग अद्याप सुद्धा आहे. या गाण्यात रविनाने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली ती खूप हॉट आणि सेक्सी दिसत होती. ज्याचे काही उत्तरच नाही. त्यांनी ‘तू चीज़ बड़ी है मस्त मस्त’ आणि ‘आँखी से गोली मारे’ या गाण्यांद्वारे लोकांना अक्षरशः वेड लावले होते.

१९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या वयाच्या ४५व्या वर्षीही रविनाचे सौंदर्य कमी झालेले नाही. ती अजूनही तिच्या अदाने आग लावत आहे. रवीना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि दररोज एअरपोर्टवर तर कधी पार्टीत स्पॉट्स होत असते. यादरम्यान, ती कित्येक प्रसंगी आपल्या मुलीबरोबरही दिसली आहे. आपणास सांगू इच्छितो कि, रवीनाच्या मुलीचे नाव राशा थडानी असून ती दिसायला खूपच सुंदर आहे.अलीकडेच राशाला तिची आई रवीनासमवेत मुंबई विमानतळावर पाहायला मिळाले. यादरम्यान, आई-मुलगीची जोडी खूपच सुंदर दिसत होती आणि तिथे उपस्थित सर्वजण त्यांच्याकडे पहातच राहिले. वास्तविक, मुलगी राशाला पाहून सर्वांच्या नजरा थक्क झाल्या. यावेळी, राशाने व्हाइट कलर टॉप आणि मेहरूण कलरचा लेदर जीन्स परिधान केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रवीनाने ब्लॅक लेदर पॅन्टसह एक मॅचिंग हूडी देखील परिधान केली. लेदर जीन्समधील आई-मुलगी जोडी आश्चर्यकारक दिसत होती.

राशाच्या लूकबद्दल सांगायचे तर तिने डोळ्यावर काळा चष्मा लावला होता आणि केस मोकळे ठेवले होते. बाजूला काळी रंगाची बॅग देखील टांगली होती. या लूकमध्ये राशा अत्यंत गॉर्जियस दिसत होती. लूकला पूरक होण्यासाठी राशाने व्हाईट स्नीकर्स घातले होते. त्याचवेळी, तिची आई रवीना बांधलेले केस, कमीतकमी मेकअप आणि काळ्या शेड्ससह खूपच सुंदर दिसत होती.आपणास सांगू इच्छितो कि ,राशा थडानी यांचा जन्म वर्ष २००५ मध्ये झाला होता. राशा सध्या १४ वर्षांची आहे आणि या वयात तिची उंची तिच्या आईएवढी जवळजवळ झाली आहे. तो दिवस आता दूर नाही जेव्हा राशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. राशा तिच्या आईप्रमाणेच सुंदर आणि स्टायलिश आहे. यामध्ये ती मोठ्या स्क्रीनवर कधी दिसणार याची चाहत्यांची प्रतीक्षा आहे. इतर स्टार किड्स प्रमाणेच राशालादेखील चर्चेत राहणे फारसं आवडत नाही, पण कोणत्या न कोणत्या कारणाने माध्यमांची नजर तिच्यावर पडूनच जाते.नुकतीच रवीना नच बलिए ९ या कार्यक्रमाची जज म्हणून दिसली. त्याच वेळी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती अखेर ‘मातृ’ मध्ये दिसली होती. आजकाल रवीना चित्रपट आणि दूरदर्शनपासून दूर आहे. आगामी काळात ती कोणत्या प्रकल्पात काम करणार आहे ते पहाणे जिकरीचे ठरेल. आपणास हा लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.