खरच रिलेशनमध्ये आहे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? लिंकअपच्या बातम्यांवर अभिनेत्रीने दिले हे उत्तर !

3 Min Read

साउथच्या चित्रपटांमध्ये लोकप्रिय झालेली अभिनेत्री रश्मिका मंदाना अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे सध्या खूपच चर्चेमध्ये आहे आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये नेहमी हा प्रश्न येतो कि खरेच रश्मिका विजयसोबत रिलेशनशिपमध्ये आहे? यादरम्यानच सोशल मिडियावर रश्मिकाचे चाहते तिच्या रिलेशनबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत, ज्यावर तिने आता उत्तर दिले आहे. चला तर जाणून घेऊया रश्मिकाने काय म्हंटले आहे?रश्मिका मंदानाने १ सप्टेंबर २०२० रोजी आपल्या इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशन द्वारे आपल्या चाहत्यांसोबत बातचीत केली. जिथे तिच्या चाहत्यांनी तिला प्रश्न विचारले, ज्यामध्ये काहींनी तिच्या डेली रुटीनबद्दल विचारले तर काहींनी तिच्या ब्यूटी सीक्रेट्सबद्दल विचारले पण नेहमीप्रमाणे यावेळी देखील तिला रिलेशनशिप स्टेटसबद्दल जास्त प्रश्न विचारले गेले. अशामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे तिने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये दिली आहे. रश्मिकाने लिहिले कि, हे त्या सर्व लोकांसाठी आहे जे माझे नाव ओळखतात आणि मला माहित आहे कि मी सिंगल आहे आणि मी यावर प्रेम करते. ट्रस्ट मी जेव्हा तुम्ही सिंगल असण्याचा आनंद घेण्यास सुरुवात करता तेव्हा तुमच्या प्रेमीसाठी तुमचे स्टेंडर्ड खूपच वर राहते.मी सिंगल आहे :- तसे अभिनेत्रीने याआधीच अनेक मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केले आहे कि ती सिंगल आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये रश्मिकाच्या रिलेशनबद्दल खूपच अफवा समोर आल्या आहेत. अनेक वेळा तिचे नाव साउथ इंडियन सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत जोडले गेले आहे. रश्मिका आणि विजयच्या नात्याच्या अफवेनंतर गीता गोविंदम (२०१८) आणि डियर कॉमरेड (२०१९) सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या केमिस्ट्रीच्या चर्चा खूपच झाल्या होत्या.लिंकअपच्या अफवांबद्दल काय म्हणणे आहे विजयचे? :- विजय देवरकोंडाने आपल्या आणि रश्मिकाच्या लिंकअपच्या अफवांचे प्रत्येकवेळी खंडन केले आहे. काही महिन्यांपूर्वी द हैदराबाद टाइम्सच्या एका मुलाखतीमध्ये जेव्हा विजयला विचारले गेले कि त्याला आयुष्यामधील प्रेम मिळाले आहे का नाही? तेव्हा यावर त्याने खुलासा केला की तो ज्या एखाद्या रिलेशनमध्ये आहे तर तो त्याला गुप्त ठेवणेच पसंत करेल. अशा गोष्टी उघड करण्याचा काय अर्थ आहे? हा कोणाचा बिजनेस नाही. मी माझ्या आई-वडिलांना आणि मित्रांना सांगेन. जेव्हा हे होईल तेव्हा याचा खुलासा जगासमोर करेन, पण यासाठी आणखी वेळ आहे. माझी इच्छा नाही कि माझे आयुष्य मनोरंजन बनावे.रश्मिकाच्या आयुष्यामध्ये विजयचे काय महत्व आहे? :- बऱ्याच दिवसांपूर्वी इंटरनेशनल बिजनेस टाइम्सच्या एका मुलाखतीमध्ये रश्मिका मंदानाने खुलासा केला आहे कि विजय देवरकोंडा तो आहे ज्याने तिच्या एक्स बॉयफ्रेंड रक्षित शेट्टीसोबतच्या ब्रेकअपमधून बाहेर येण्यास मदत केली होती. तिने म्हंटले कि मी रक्षित शेट्टीसोबतच्या ब्रेकअपमधून बाहेर येत होती. मला आराम आणि काळजीची गरज होती जी मला विजय देवरकोंडाकडून मिळाली. मी माझ्या इमोंशसचा सामना करण्याचा संघर्ष करत होते आणि तो हा होता ज्याने मला समजून घेतले. त्याने मला समजावले कि बाहेर एक वेगळे जग आहे, जे मला भेटण्यासाठी वाट पाहत होते.सध्या रश्मिकाने आपल्या चाहत्यांना उत्तर देताना स्पष्ट केले आहे कि ती विजय देरवकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये नाही. तथापि यामध्ये किती सत्यता आहे हे तर येणारा काळच सांगेल. तर तुम्हाला आमची हि स्टोरी कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्यासाठी काही सल्ला अवश्य द्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *