रश्मिका मंदानाचा गुडबाय चित्रपट लवकरच रिलीज झोणार आहे. यादरम्यान तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पाच फोटो शेयर केले आहेत. यामध्ये तिला डेनिम कपड्यांमध्ये पाहू शकता. तिने डेनिमचा शर्ट देखील घातला आहे. ज्याचे बटन खोलून ती कपडे काढताना पोज देत आहे. याशिवाय तिने डेनिम ब्रॅलेट आणि डेनिम शॉर्ट ड्रेस घातला आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदानाने फोटो शेयर करताना लिहिले आहे कि, आज मला निळ्या रंगासारखे वाटत आहे. रश्मिका मंदानाचे फोटो खूपच पसंद केले जात आहेत. याला एका तासामध्ये ७ लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर ५ हजार पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. अनेक लोकांनी फोटोवर क्यूटी पाई, वेटिंग फॉर द मूवी, हॉट, लव यू माई क्रश, अमेजिंग अशा ब्यूटीफुल केल्या आहेत.

रश्मिका मंदाना लवकरच गुडबाय चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत नीना गुप्ता आणि अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटामधून रश्मिका मंदाना बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

नुकतेच या चित्रपटामधील गाण्यावर डांस करताना पाहिले गेले होते. या व्हिडीओवर देखील चाहत्यांनी देखील भरभरून प्रेम केले. रश्मिका मंदाना शिवाय अनेक डांसर देखील गाण्यामध्ये डांस करताना पाहायला मिळत आहेत.

गुडबाय ७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. रश्मिका मंदाना नुकतेच अल्लू अर्जुनसोबत पुष्पा द राइज चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटामधील रश्मिका मंदानाचा अंदाज आणि केमेस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली होती.