बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या संघर्ष आणि कठोर परिश्रमांमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे स्थान मिळवले आहे. रविना टंडनने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रविना टंडन सध्या खूपच चर्चेमध्ये आहे.

तिने मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितले कि जेव्हा ती एका चित्रपटाच्या गाण्याची शुटींग करत होती तेव्हा सगळीकडे दगड आणि खिळे पडले होते आणि तिला अनवाणी पायाने डांस करायचा होता. यादरम्यान तिला ताप देखील आला होता कारण गाण्याच्या शुटींगमध्ये पावसाचा सीन होता आणि पावसामध्ये भिजल्यामुले तिची तब्येत खूपच खराब झाली होती.

तिच्या गुडघ्याला देखील दुखापत झाली होती. तिने सांगितले कि एक अभिनेत्रीला पावसामध्ये डांस करताना खूपच अडचणीचा सामना करावा लागतो. ती पुढे म्हणाली कि मला उत्तेजित गाणी करण्यात कधीच कंम्फर्टेबल वाटत नव्हते पण मला करावे लागत होते.

वास्तविक हा टिप टिप बरसा पानी गाण्या दरम्यानचा किस्सा आहे. हे गाणे मोहरा चित्रपटामधील होते. जो १९९४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेमध्ये होते. हे गाणे उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायले होते.

या गाण्याचा रिमेक सूर्यवंशी चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. रविना टंडन म्हणाली कि पहिला गाण्याची शुटींग करताना खूपच अडचण येत होती. पण आता तसे नाही. आता चित्रपटामधील गाणी शूट करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.