डिलीट झालेले व्हॉट्सऍपचे मेसेज सुद्धा वाचायचे आहेत? मग नक्की वाचा !

3 Min Read

व्हॉट्सऍपवर ज्या ज्या वेळेला मेसेज डिलीट होतो तेव्हा त्याठिकाणी मेसेज डिलीट झाला आहे (This message was deleted ) असे लिहून येते. हे असे सेंड आणि रिसिव्ह करणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या चॅट स्क्रीनवर दिसून येते. जर व्हॉट्सऍपवर तुम्ही एखादा मेसेज चुकीच्या व्यक्तीला पाठवला असेल तर तुम्ही तो मेसेज Delete for everyone या फिचरचा वापर करून डिलीट करता. मात्र यानंतरही प्रत्येक व्यक्तीला तो मेसेज काय होता हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली असते. 2017 च्या अखेरीस व्हॉट्सऍपने हे नवीन फीचर आणले होते. या फिचरचा उपयोग करण्यासाठी जो मेसेज डिलीट करायचा आहे तो सिलेक्ट करावा लागतो. तो मेसेज सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर दोन पर्याय उपलब्ध होतात.

या दोन पर्यायांमधील Delete for everyone हा पर्याय सिलेक्ट करून मेसेज डिलीट केला जातो. अनेकदा आपले मित्र- मैत्रिणी मस्करीमध्ये एखादा मेसेज पाठवून तो डिलीट करतात. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जो मेसेज तुम्हाला पाठवल्यानंतर डिलीट केला होता तो मेसेज नक्की काय होता.एखादा मेसेज डिलीट केल्यानंतर This message was deleted असे लिहून येते. हे मेसेज पाठविणारा आणि तो मेसेज रिसिव्ह करणारा या दोघांकडेही दिसते. मात्र असे असले तरीही ही रिसीव्ह करणारी व्यक्ती हा डिलीट केलेला मेसेज अगदी होता तसा वाचू शकते. काय…आश्चर्यचकित झालात? पण होय हे खरंच शक्य आहे. यासाठी तुम्हाला आम्ही सांगतो तसं करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला एका थर्ड पार्टी अॅप्लीकेशनची गरज लागणार आहे, या अॅप्लीकेशनचे नाव (Notification History) आहे. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमधील नोटिफिकेशन एक्सेस करतात आणि नोटिफिकेशनच्या माध्यमातून डिलिट केलेला मेसेज काय होता हे सहजरित्या तुम्हाला दाखवते.

व्हॉट्सऍप ऍप्लिकेशनची लोकप्रियता जगभरात मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन व्हॉट्सऍप नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स देण्याचा प्रयत्न करत असते. या नवीन फीचर्स प्रमाणेच आणखीन काही आकर्षक फीचर्स व्हॉट्सऍप आपल्या ग्राहकांसाठी लवकरच घेऊन येणार आहे. यामध्ये डार्क मोड, सायलेंट फीचर, व्हेकेशन मोड यांसारख्या फिचर्सचा समावेश असणार आहे.काय आहे हे डार्क मोड फीचर?
जेव्हा आपण रात्री व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असतो. तर त्यावेळी रात्रीच्या अंधारात मोबाईलचा प्रकाश तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम करतो. परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅपवर डार्क मोड फीचर मिळाल्यानंतर तुमची नक्कीच या त्रासापासून सुटका होईल. हे फीचर चालू करताच व्हॉट्सअ‍ॅपवरील बॅकग्राउंड कलर ब्लॅक होईल. याद्वारे, वापरकर्ते दीर्घकाळ कोणत्याही अडचणीशिवाय व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करू शकतील आणि यामुळे डोळ्यांवर परिणाम देखील होणार नाही. हे असे फायदेशीर फीचर कोणाला आवडणार नाही? त्यामुळे हे असे फायदेशीर फीचर कधी वापरात येते याची वाट व्हॉट्सऍप युझर्स आतुरतेने बघत आहेत.

सध्या व्हॉट्सऍपकडून या फिचर्सची टेस्टिंग सुरू आहे आणि लवकरच ते आपल्याला मिळतील अशी शक्यता आहे. 2018साली व्हॉट्सऍपने स्टिकर फीचर सादर केले होते. या फिचरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. दिवाळी आणि नवीन वर्षांच्या शुभेच्छांसाठी युजर्सनी या स्टिकर्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *